पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आयसीसीवर भारताला अवाजवी पाठिंबा दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. समा टीव्ही शोमध्ये बोलताना शाहिद आफ्रिदीने हा आरोप केला आहे. शाहिद आफ्रिदी भारत-बांगलादेश सामन्याबद्धल बोलताना म्हणाला, ‘तुम्ही पाहिले असेल की मैदान किती ओले होते. पण आयसीसीचा कल भारताकडे आहे. त्यांना कोणत्याही किंमतीत भारताला उपांत्य फेरी पोहोचवायचे आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान अंपायर देखील तेच होते, ज्यांना सर्वोत्कृष्ट पंचाचा पुरस्कार मिळेल असे दिसते.’

शाहिद आफ्रिदी पुढे म्हणाला, ‘पाऊस खूप झाला होता. मात्र, विश्रांतीनंतर खेळ पुन्हा सुरू झाला. हे अगदी स्पष्ट आहे की आयसीसीमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होता, भारत जो सामना खेळत होता, त्यात येणारा दबाव, अनेक घटक गुंतलेले आहेत. पण, लिटन दासची फलंदाजी अप्रतिम होती. तो सकारात्मक क्रिकेट खेळला. सहा षटकांनंतर आम्हाला वाटले की बांगलादेशने आणखी २-३ षटकात विकेट गमावल्या नसत्या तर सामना जिंकला असता. एकूणच बांगलादेशने दाखवलेली झुंज उत्कृष्ट होती.

पावसाने व्यत्यय आणलेल्या टी-२० विश्वचषक सामन्यात भारताने बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केल्यावर ही प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत १८४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लिटन दासने २१ चेंडूत झळकावलेल्या अर्धशतकामुळे बांगलादेशने सामन्यात मजबूत पकड मिळवली होती.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : भारताला विश्वचषक जिंकायचा असेल, तर ‘हा’ खेळाडू टिकला पाहिजे; रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य

मात्र, बांगलादेशने सात षटकांत ६६/० अशी मजल मारल्यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. त्यानंतर बांगलादेशला १६ षटकांत १५१ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. अशा परिस्थितीत पाकिस्तानी चाहत्यांचा असा विश्वास आहे की, पावसामुळे खेळपट्टी ओली असूनही आयसीसीने मुद्दामच सामना सुरू केला. कारण सामना पुन्हा सुरू झाला नाही तर भारत हा सामना गमावेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.