पाकिस्तान संघचा प्रशिक्षक म्हणून पीसीबीसाठी पसंतीचा आणि मोठा उमेदवार हा शेन वॉटसन होता. असे असतानाही ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. ईएसक्रिकइन्फोने दिलेल्या अहवालानुसार, वॉटसनने अलीकडेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. त्यानंतर पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षक पदासाठी चर्चा सुरू होती, परंतु सध्याच्या कोचिंग आणि समालोचनाची जबाबदारी खांद्यावर असल्याने त्यांना प्राधान्य देण्याचा त्याने निर्णय घेतला.

मेजर लीग क्रिकेटमध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससह त्याची भूमिका आणि आयपीएलमधील त्याच्या समालोचन करार यांचा त्याच्या समावेश आहे. वॉटसनने सुरुवातीला पीसीबीच्या ऑफरचा विचार केला, परंतु पीएसएल दरम्यान त्याने पाकिस्तानमध्ये चांगला वेळ घालवला. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अनेक भूमिकांमध्ये समतोल साधण्याची आवश्यकता आणि शेवटी आपल्या खांद्यावर पूर्वीपासूनच असलेल्या जबाबदाऱ्या यांना प्राधान्य दिले. त्याच्या या निर्णयामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिका आणि जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला मुख्य प्रशिक्षकाशिवाय राहावे लागणार आहे.

Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल

क्वेटा ग्लॅडिएटर्सचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने वॉटसनने संघ रचनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. उल्लेखनीय बाब म्हणजे रिली रूसोने दीर्घकाळ कर्णधारपद भूषविणाऱ्या सर्फराज अहमदची जागा घेतली. त्याच्या मार्गदर्शनाखाली ग्लॅडिएटर्सने पीएसएलमध्ये चांगल फॉर्म दाखवला, स्पर्धेतील पुढील टप्प्यातून बाहेर पडण्यापूर्वी क्वेटा ग्लॅडिएटर्स पाच हंगामात प्रथमच प्लेऑफमध्ये पोहोचले.