Fastest Ball In IPL History : आयपीएल २०२२ मध्ये झालेल्या ५० व्या सामन्यात सनरायजर्स हैद्राबादचा गोलंदाज उमरान मलिकनने एक वेगवान चेंडू फेकत इतिहास रचला होता. उमरानने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील दुसरा वेगवान चेंडू फेकला होता. उमरानच्या गोलंदाजीचा वेग पाहून क्रिडा विश्वात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

उमरान मलिकने रचला होता इतिहास

उमरानने दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी सुरु असताना २० व्या षटकातील चौथा चेंडू 157 kmph च्या वेगानं फेकला होता. हा चेंडू आयपीएल इतिहासातील दुसरा वेगवान चेंडू म्हणून नोंदवण्यात आला. आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या माजी गोलंदाज शॉन टेटच्या नावावर आहे. शॉनने आयपीएल २०११ मध्ये 157.71 kmph वेगाने चेंडू फेकला होता.

नक्की वाचा – IPL इतिहासातील ‘नर्व्हस ९९’; शतकाच्या उंबरठ्यावर असताना ‘या’ फलंदाजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम

१) शॉन टेट (ऑस्ट्रेलिया) – 157.71 kmph
२) उमरान मलिक (भारत) – 157.00 kmph
3) एनरिक नॉर्किया (दक्षिण आफ्रिका) – 156.22 kmph
४) उमरान मलिक (भारत) – 156.22 kmph
५) एनरिक नॉर्किया (दक्षिण आफ्रिका) – 155.21 kmph
६) उमरान मलिक (भारत) – 154.80 kmph