जगभरात सध्या एका छोट्या विषाणूने साऱ्यांना ‘लॉकडाउन’ केले आहे. करोनाच्या भीतीने क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला ब्रेक लागला आहे. भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धेचे आयोजनदेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. सर्व क्रिकेटपटू आणि सहाय्यक वर्ग सध्या आपापल्या घरी आहे. काही क्रिकेटपटू लाइव्ह चॅटमध्ये व्यस्त आहेत, तर काही क्रिकेटपटू टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ करत आहेत. या दरम्यान, जुने फोटो पोस्ट करण्याचा एक ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे. इंग्लंडचा रवी बोपारा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू प्रविण कुमार या साऱ्यांनी काही जुने फोटो शेअर केले. सलामीवीर शिखर धवननेही रैनासोबतचा एक जुना फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता त्याने स्वत:चा एक जुना फोटो शेअर केला आहे.
IPL : “तेव्हा धोनी अंपायरशी तावातावाने भांडला अन्…”
शिखर धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक झकास गॉगल लावलेला जुना फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत त्याने काळा शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम जिन्स घातली आहे. त्या कपड्यांवर काळ्या रंगाचा गॉगल घालून त्याने सोफ्यावर आडवा होत एक फोटो काढला होता. तो जुना फोटो त्याने शेअर केला आहे. त्या फोटोवर त्याने तेव्हा मी कूल होतो असं कॅप्शदेखील दिलं आहे.
“गांगुलीला उकसवणं अगदी सोपं”; माजी खेळाडूने सांगितली मैदानावरील भांडणाची आठवण
दरम्यान, सुरूवातीला इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू रवी बोपारा याने स्वत:चा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता, नंतर चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काही भारतीय क्रिकेटर्स एकत्र असलेला एक जुना फोटो शेअर केला होता. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार याने रोहित शर्मा आणि रैनासोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला होता. त्या पाठोपाठ भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन याने त्याच्या इन्स्टाग्रामवरून सुरेश रैनाचा एक फोटो शेअर केला होता.
ICC च्या ट्विटवर सचिन, गांगुलीचा अफलातून रिप्लाय
त्यानंतर मास्टरब्लास्टर सचिनला देखील आपला जुना फोटो शेअर करण्याचा मोह आवरला नव्हता. १९९२ मध्ये इंग्लंडच्या कौंटी क्रिकेट स्पर्धेत सचिन यॉर्कशायर संघातर्फे खेळला होता. इंग्लंडच्या वातावरणाचा नीट अंदाज यावा, या उद्देशाने सचिनने यॉर्कशायरशी करार केला होता. तेव्हा सचिन केवळ १९ वर्षाचा होता. त्या वेळचे दोन फोटो सचिनने शेअर केले होते. यॉर्कशायर संघाकडून खेळणारा विदेशात जन्मलेला सचिन पहिला खेळाडू होता. त्या आधी यॉर्कशायर संघाने कोणालाही संघात संधी दिली नव्हती.