Shikhar Dhawan on Mohammad Rizwan : सध्या पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील आतापर्यंत चार सामने खेळले गेले असून चारही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. पाकिस्तान संघाने ही मालिका आधीच गमावली आहे. मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी १९ जानेवारी रोजी खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला ‘शॉर्ट रन’ घेणे महागात पडले. त्यानंतर आता सोशल मीडियावर रिझवानची खूप खिल्ली उडवली जात आहे.

शिखर धवनने रिझवानची उडवली खिल्ली –

न्यूझीलंडसोबत खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात मोहम्मद रिझवान पाकिस्तान संघाकडून फलंदाजी करत असताना एक रंजक घटना समोर आली. वास्तविक, रिझवानने शॉट खेळला तेव्हा बॅट त्याच्या हातातून निघून गेली. यानंतर रिझवान धाव घेण्यासाठी धावला. यावेळी मोहम्मद रिझवान हात टेकवून धावा पूर्ण करताना दिसला. रिझवानने बॅट हातात नसल्याने हाताने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तरी तो यशस्वी होऊ शकला नाही.

Three bookies arrested for betting on RCB vs Sunrisers Hyderabad IPL match
आरसीबी आणि सनरायझर्स हैदरबाद आयपीएल सामन्यात सट्टेबाजी, तीन बुकींना अटक
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Shubman Gill Argument with Umpire during the GT vs LSG match
GT vs LSG : डीआरएसवरून झाला वाद, शुबमनसह गुजरात टायटन्सचे खेळाडू भिडले अंपायरशी, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

त्याचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवननेही मोहम्मद रिझवानच्या ‘शॉर्ट रन’ची मजा घेतली आहे. शिखर धवनने सोशल मीडियावर रिझवानचा एक ‘शॉर्ट रन’ घेतल्याचा फोटो शेअर केला आणि कबड्डी, कबड्डी, कबड्डी असे लिहिले. यासोबतच धवनने हसणारा इमोजीही शेअर केला आहे.

हेही वाचा – IPL 2024 : टाटा समूहच राहणार आयपीएलचे टायटल स्पॉन्सर! पाच वर्षांसाठी लावली २५०० कोटींची बोली

न्यूझीलंडने पाकिस्तानचा ७ विकेट्सने उडवला धुव्वा –

टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात ५ गडी गमावून १५८ धावा केल्या. या सामन्यात मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ९५ धावांची नाबाद खेळी साकारली. याशिवाय मोहम्मद नवाजने २१ धावा केल्या. न्यूझीलंडने १८.१ षटकांत ३ गडी गमावून सामना जिंकला. न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना डॅरिल मिशेलने नाबाद ७२ धावांची तर ग्लेन फिलिप्सने ७० धावांची नाबाद खेळी खेळली. आता या मालिकेत न्यूझीलंडने ४-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.