टोकियो शहरात सुरु असलेल्या ऑलिम्पिक सराव स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुष गटात भारताच्या शिव थापाने ६३ किलो वजनी गटात तर महिलांमध्ये पुजा राणीने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं आहे. याचसोबत ६९ किलो वजनीगटात भारताच्या आशिषला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

४ वेळा आशियाई खेळांचं विजेतेपद पटकावणाऱ्या शिव थापाने कझाकस्तानचा राष्ट्रीय चॅम्पियन संताली टोयत्येव वर ५-० ने मात केली. दुसरीकडे पुजा राणीने ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली. मात्र भारताच्या आशिषला ६९ किलो वजनी गटात जपानच्या सेवॉन ओकाझावाकडून पराभवाचा सामना करावा लागला.