scorecardresearch

‘भारताचे खेळाडूही आम्हाला मिठ्या मारतात, पण अफगाणिस्तानचे मात्र…’ शोएब अख्तरने व्यक्त केली नाराजी

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत ७ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन संघांत लढत झाली.

‘भारताचे खेळाडूही आम्हाला मिठ्या मारतात, पण अफगाणिस्तानचे मात्र…’ शोएब अख्तरने व्यक्त केली नाराजी
शोएब अख्तर आणि अफगाणिस्तान-पाकिस्ता सामन्यादरम्यान झालेला वाद

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत ७ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन संघांत लढत झाली. अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर विजयासाठी १२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र धावसंख्या कमी असली तरी हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. पाकिस्तानने या सामन्यात एक गडी राखून विजय मिळवला. मात्र या सामन्यामध्ये पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीने अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद याच्यावर बॅट उगारल्याने काही काळासाठी तणाव निर्माण झाला. त्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान समर्थकांमध्ये चांगलीच हाणामारी आणि खुर्च्यांची फेकाफेक झाली. या घटनेनंतर क्रिकेट जगतातून नाराजी व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शेएब अखतरने तर भारत-पाकिस्तान संबंधाचा दाखला देत नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >> Video : पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव करताच मैदानात राडा, प्रेक्षकांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या

अफगाणिस्तान-पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये झालेला वाद आणि समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर शोएब अख्तरने अफगाणिस्तानवर नाराजी व्यक्त केली आहे. “अफगाणिस्तान संघ चांगला खेळ खेळतोय. आम्ही त्यांना आमचे शेजारी समजतो. आम्ही अफगाणिस्तानची काळजी घेतो. भारताचे खेळाडूदेखील आम्हाला मिठ्या मारतात. पण अफगाणिस्तानकडून मात्र चुकीचे वर्तन केले गेले,” असे शोएब अख्तर म्हणाला आहे.

हेही वाचा >> Asia Cup 2022: पाकिस्तानच्या आसिफ अलीने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट, मैदानातच तुफान राडा

पाकिस्तान-अफागणिस्तान सामन्यात नेमकं काय घडलं होतं?

अफगाणिस्तानला ६ बाद १२९ असे रोखल्यानंतर पाकिस्तानने १९.२ षटकांत ९ बाद १३१ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर अडखळला होता. १९ व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर आसिफ बाद झाल्यानंतर फरीदने त्याच्यासमोर जाऊन आक्रमकपणे आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. यानंतर चिडलेल्या आसिफने त्याला मागे ढकललं. यानंतर फरीद पुन्हा पुढे आल्यानंतर आसिफने त्याच्यावर बॅट उगारत संताप व्यक्त केला. यानंतर अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनी फरीदला बाजूला नेत वाद मिटवला.

हा सामना गमावल्यानंतर अफगाणिस्तानचे चाहते स्टेडियममध्येच पाकिस्तानी चाहत्यांवर तुटून पडले आणि त्यांना बेदम मारहाण केली. अफगाण चाहत्यांनी स्टेडियमचेही नुकसान केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shoaib akhtar got disappointed over clash between pakistan afghanistan players prd

ताज्या बातम्या