Shoaib Akhtar heaps praise on Pakistan’s pace battery: आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर सामन्यात रविवारी (१० सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. या भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या संघातील सध्याच्या वेगवान त्रिकुटाचे कौतुक केले. शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह हे त्रिकूट जगातील सर्वोत्तम वेगवान आक्रमण आहे, असे त्याचे मत आहे. त्याचबरोबर शाहीन आफ्रिदी हा जगातील सर्वात घातक वेगवान गोलंदाजांपैकी एक असल्याचे त्याने कबूल केले.

पाकिस्तानकडे जगातील सर्वोत्तम वेगवान आक्रमण –

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेदरम्यान शोएब अख्तर म्हणाला की, मला खूप आनंद होत आहे की, पाकिस्तान वारंवार जागतिक क्रिकेटमध्ये ठसा उमटवणारे वेगवान गोलंदाज तयार करत आहे. मला माहित नाही कारण काय आहे. पूर्वी पंजाबमध्ये (पाकिस्तानात राहणारे) अनेक वेगवान गोलंदाज असायचे, पण दोन्ही पठाणांपैकी एक रावळपिंडीचा आहे. ही वेगवान बॅटरी मला जुन्या दिवसांची आठवण करून देते.

शाहीन आफ्रिदी सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक –

शोएब अख्तर पुढे म्हणाला की, “मी म्हणेन की शाहीन आफ्रिदी सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. सध्या तो त्याच्या कारकिर्दीत अव्वल स्थानावर आहे, तर हरिस रौफची विकेट घेण्याची तीच मानसिकता आहे. अगदी शाहीन आफ्रिदीचीही विकेट कशी घ्यायची जशी मानसिकता आहे.” शोएबने नसीम शाहचेही कौतुक केले आणि तो शाहीनपेक्षा चेंडू चांगला स्विंग करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. नसीम पाकिस्तानसाठी खरा विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोएब अख्तरने नसीम शाहला पाठवला खास संदेश –

नसीम शाहबद्दल बोलताना शोएब अख्तर पुढे म्हणाला, “जेव्हा आपण नसीम शाहबद्दल बोलतो, तेव्हा मी त्याला आणि त्याच्या भावाला स्टॉक गोलंदाज बनण्याऐवजी अधिक विकेट घेणारे चेंडू टाकण्याचा संदेश पाठवला आहे. मला असे वाटते की, त्याला स्टॉक गोलंदाज न करता, विकेट घेणारा गोलंदाज बनवण्याचा संदेश देण्यात आला आहे. तो शाहीनपेक्षा जास्त चेंडू सीम करतो आणि मला वाटते की तो चेंडूने आणखी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे मला वाटते की, हे त्रिकूट सर्वोत्तम वेगवान आक्रमणांपैकी एक आहे.”