भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक या जोडीच्या घटस्फोटाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होत आहे. दोघेही वेगळे राहत असून त्यांच्याच सर्व आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचा दावाही शोएबच्या जवळच्या व्यक्तीने केला होता. सानिया-शोएबने मात्र यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती.

याच चर्चांदरम्यान, सानिया-शोएबने ‘द मिर्झा मलिक शो’ नावाच्या टॉक शोची घोषणा केली. दोघेही वेगळे होणार आहेत, मात्र प्रोफेशनल डील्समुळे ते हा शो एकत्र करत असल्याचंही वृत्त आलं होतं. अशातच सानियाच्या वाढदिवसानिमित्त शोएबने तिच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टने लक्ष वेधलंय. सानियाचा आज ३६वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त तिचे मित्र-मैत्रिणी, चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तिचा पती शोएबनेही एक फोटो शेअर करत सानियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सानिया मिर्झा-शोएब मलिक यांनी चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का, लवकरच शेअर करणार स्क्रीन

“सानिया मिर्झा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा! खास दिवसाचा पुरेपूर आनंद घे,” असं शोएबने ट्वीटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, दोन्ही स्पोर्ट्स स्टार्स पाकिस्तानमधील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म उर्दूफ्लिक्सवर शोसाठी एकत्र येणार आहेत. “मिर्झा मलिक शो लवकरच फक्त उर्दूफ्लिक्सवर,” असं या ओटीटी प्लॅटफॉर्मने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं.

View this post on Instagram

A post shared by UrduFlix (@urduflixofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सानिया आणि शोएब यांचा प्रेमविवाह झाला होता. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघेही १२ एप्रिल २०१० रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्या दोघांनी हैदराबादमध्ये लग्न केलं होतं. नंतर पाकिस्तानमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. सानिया मिर्झा हिने २०१८ मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव इझान असे आहे. सध्या सानिया ही ३५ वर्षांची असून शोएब मलिक हा ४० वर्षांचा आहे.