scorecardresearch

Sania Shoaib Divorce: सानिया मिर्झा सोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएब मलिकने सोडले मौन; म्हणाला…

काही दिवसांपूर्वी पासून शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहेत. यावर शोएब मलिकने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Sania Shoaib Divorce: सानिया मिर्झा सोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएब मलिकने सोडले मौन; म्हणाला…
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक (संग्रहित छायाचित्र -इंडियन एक्सप्रेस)

गेल्या एक महिन्यापासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात काही बरोबर नसल्याच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहे. यावर शोएब मलिकने अखेर टेनिस स्टार सानिया मिर्झाशी घटस्फोटाबाबत मौन सोडले आहे. शोएब मलिक घटस्पोटाबाबत बोलताना बहुप्रतिक्षित टॉक शो द मिर्झा मलिक शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये, त्याने पत्रकारांना एकटे सोडण्याची विनंती केली आहे.

महिनाभरापासून या कपलच्या विभक्त होण्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. मलिकने आयेशा उमरसोबत मिळून सानियाची फसवणूक केल्याचे काहींनी म्हटले आहे. त्यानंतर, पाकिस्तानी अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिले की, तिचा यामध्ये सहभाग नाही. मलिक आणि सानिया आधीच वेगळे झाले आहेत आणि घटस्फोटाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत, असा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

शोएब मलिकने सोडले मौन –

शोएब मलिकने आता या वादावर मौन सोडले आहे, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. तसेच त्याला एकटे सोडण्याची विनंती केली आहे. तसेच त्याने सानिया आणि त्यांच्या विभक्त होण्याबाबत मी कोणतेही उत्तर देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – ENG vs PAK 2nd Test: अबरार अहमदने पदार्पणातच रचला मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा पाकिस्तानचा तिसराच गोलंदाज

खरं तर, टेनिस स्टार आणि पाकिस्तानी क्रिकेटरच्या टीव्ही शोसाठी काही कमिटमेंट्स आहेत. सानिया आणि शोएबने करारावर स्वाक्षरी केली आहे आणि त्याचसाठी शूटिंग पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर जोडपे घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतात. जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, सानिया आणि मलिकचे संबंध यापूर्वीही अनेकदा ताणले गेले आहेत.

हेही वाचा – ENG vs PAK 2nd: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ

दरम्यान मलिकने सानियाची फसवणूक केल्याच्या अफवा आहेत. कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. परंतु सानिया आणि शोएबच्या जवळच्या जोडप्याने पुष्टी केली आहे की, ते त्यांच्या वेगळ्या मार्गाने जात आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 16:51 IST

संबंधित बातम्या