पाकिस्तानचा स्टार फलंदाज शोएब मलिक आणि गोलंदाज वहाब रियाझ लंका प्रीमियर लीगदरम्यान गप्पा केल्या. या दोन्ही क्रिकेटपटूंनी संभाषणादरम्यान एकमेकांबद्दल मनोरंजक आणि मजेदार गोष्टी उघड केल्या. रियाझ आणि मलिक यांनी ‘स्प्रे चॅलेंज’मध्ये भाग घेतला. यासोबतच त्यांनी एकमेकांबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान शोएब मलिकने खुलासा केला, की भारतीय टेनिसपटू आणि त्याची पत्नी सानिया मिर्झाला त्याच्यासाठी स्वयंपाक करणे का आवडत नाही.

खरेतर, या चॅलेंजदरम्यान दोन्ही खेळाडूंना विचारण्यात आले होते, की जेवणासाठी कोण जास्त उतावळा आहे? यावर शोएब मलिक म्हणाला, ”हा प्रश्न माझ्या पत्नीला विचारा. मग तुम्हाला सविस्तर उत्तर मिळेल. म्हणूनच तिला जेवण कसे करायचे हे माहीत नाही आणि ती बाहेरून ऑर्डर करते, कारण मी खूप उग्र आहे.”

दोघांपैकी कोणता खेळाडू आळशी आहे, असे विचारले असता? यावर शोएब मलिकने रियाझवर बोट दाखवले. तो म्हणाला, “कारण रियाझ हा वेगवान गोलंदाज आहे आणि त्याला खूप उर्जेची गरज आहे. कदाचित म्हणूनच तो आळशी आहे.”

हेही वाचा – ASHES : JOS THE BOSS..! बटलरनं घेतला स्पायडरमॅन झेल; VIDEO पाहून चाटच पडाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१० मध्ये शोएब आणि सानियाच्या प्रेमासंदर्भात चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर त्यांनी १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केले. आज या दोघांना तीन वर्षांचा एक मुलगा असून त्याचे नाव इजहान मिर्झा मलिक असे आहे.