Shoaib Malik’s all round performance : बीपीएल २०२४ च्या १९ व्या सामन्यात शनिवारी फॉर्च्युन बरीशाल आणि खुलना टायगर्स आमनेसामनने आले होते. या सामन्यात शोएब मलिकच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर फॉर्च्युन बरीशालने खुलना टायगर्सचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना खुलना टायगर्स संघाने २० षटकांत ८ बाद १५५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात फॉर्च्युन बरीशाल संघाने १९.४ षटकात ५ बाद १५६ धावा करत विजय नोंदवला. फॉर्च्युन बरीशालचा शोएब मलिकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

नाणेफेक गमावून प्रथम खेळताना खुलना टायगर्सचा कर्णधार अनामूल हक १२ धावा करून बाद झाला. दुसरा सलामीवीर परवेझ हुसेनने २४ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. इथून डाव गडगडला आणि सतत विकेट पडत राहिल्याने धावसंख्या ८८/७ झाली. अशा परिस्थितीत मोहम्मद नवाज आणि फहीम अश्रफ यांनी शानदार अर्धशतकी भागीदारी केली, ज्यामुळे धावसंख्या १५० च्या पुढे गेली. अश्रफने १३ चेंडूत ३२ धावा केल्या. तर, नवाज २३ चेंडूत ३८ धावा करून नाबाद राहिला. फॉर्च्युन बरीशालतर्फे शोएब मलिक आणि तैजुल इस्लामने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: CSK vs GT सामना जडेजासाठी ठरला खास, सीएसकेच्या चाहत्यांनी ८ मिनिटे जागेवर उभं राहत दिली मानवंदना, काय आहे कारण?
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: …आणि रोहित शर्मा पंड्याला म्हणाला, “कोण? मी?”, हार्दिकच्या ‘या’ कृतीवर चाहत्यांचा संताप; पाहा नेमकं काय घडलं मैदानात!

लक्ष्याचा पाठलाग करताना फॉर्च्युन बरीशालचे दोन्ही सलामीवीर पहिल्या सहा षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतले. सौम्या सरकार आणि मुशफिकूर रहीम यांनी धावसंख्या ६० पर्यंत नेली. सरकारने २६ तर रहीमने २७ धावा केल्या. महमुदुल्लाह ४ धावा करून १०१ धावसंख्येवर बाद झाला. येथून शोएब मलिक आणि मेहदी हसन मिराज यांनी ५५ धावांची नाबाद भागीदारी करत आपल्या संघाला विजयाकडे नेले. मलिकने २५ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या, तर मिराजने १५ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. खुलना टायगर्सकडून फहीम अश्रफने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal : द्विशतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वालने कोणाला दिला ‘फ्लाइंग किस’? स्वतः केला खुलासा

काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक अफवा पसरत होती की मॅच फिक्सिंगच्या संशयामुळे फ्रँचायझीने मलिकचा करार रद्द केला आहे. २२ जानेवारीला खुलना टायगर्सविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीच्या षटकात तीन नो बॉल टाकल्यानंतर अशा प्रकारच्या अटकळांना सुरुवात झाली होती. यानंतर शोएब मलिकने या सर्व अफवा असल्याच्या सांगितल्या होत्या. त्यानंतर आता या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरीने आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.

हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध खणखणीत शतक झळकावत टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

शोएब मलिक तिसऱ्या लग्नानंतर सातत्याने चर्चेत –

सध्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने सना जावेदशी तिसरे लग्न केल्याने चर्चेत आहे. याआधी त्याने आयशा सिद्दीकी आणि सानिया मिर्झा यांच्याशी लग्न केले होते. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ही शोएब मलिकची दुसरी पत्नी होती. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबाद येथे या दोघांचा विवाह संपन्न झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ साली दोघे इझहानचे पालक झाले. मागच्या काही वर्षांपासून या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी असल्याचे बोलले जात होते. मात्र त्याबद्दल दोघांनीही जाहीर वाच्यता केली नाही किंवा नात्यामधील तणाव बाहेर दाखवला नव्हता. त्यानंतर थेट शनिवारी शोएब मलिकच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे त्यांच्या चाहत्याना याची बातमी कळली.