Shreyas Iyer Viral Video: भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर गेला काही काळ भारतीय संघापासून दूर होता. इशान किशनसहित श्रेयस अय्यरलाही बीसीसीआयच्या केंद्रिय करारतून वगळण्यात आले होते. श्रेयसला नुकत्याच झालेल्या श्रीलंकाविरूद्धच्या वनडे मालिकेत संधी मिळाली होती, पण तो फार चांगली कामगिरी करू शकला नाही. सध्या भारतीय संघ विश्रांती घेत असून आपल्या कुटुंबाबरोबर आहे. यादरम्यानच श्रेयस अय्यर आज मुंबईत दिसला होता, त्याचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: “आमचं असंच चालतं…” रोहितचा धवल, नायरसह कॅफेमध्ये हटके सेल्फी, मराठमोळ्या मित्राच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

दुखापतीमुळे संघाबाहेर राहिल्यानंतर श्रेयस अय्यरने इंडियन प्रीमियर लीगमध्ये जोरदार पुनरागमन केले. आपल्या नेतृत्त्वाखाली त्याने कोलकाता नाईट रायडर्सला पुन्हा एकदा आयपीएल चॅम्पियन बनवले. श्रेयस नुकताच एका मुंबईतील सलूनबाहेर दिसला होता. जिथे त्याला भेटण्यासाठी काही चाहते जमा झाले होते. ज्यामध्ये श्रेयस अय्यर सलूनमधून बाहेर येताच पापाराझी आणि लोकांनी घेरले होते. तर तितक्यात तिथे रस्त्याच्या बाजूला वस्तू विकणाऱ्या गरीब महिलेने त्याच्याकडे पैसे मागितले.

हेही वाचा – Vinesh Phogat: थकलेल्या विनेश फोगटला गावातील सत्कार समारंभादरम्यान आली चक्कर, VIDEO होतोय व्हायरल

श्रेयस अय्यरने पैसे मागत असलेल्या गरीब महिलेला दिले पैसे

श्रेयस अय्यरच्या एका चाहत्याने तो बाहेर येताच जर्सीवर त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी पुढे सरसावला. श्रेयस अय्यरनेही त्याला नाराज न करता त्याच्या बॅटवर ऑटोग्राफ दिला आणि जर्सीवरही ऑटोग्राफ दिला. दुसऱ्या चाहत्याला त्याच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ देतो. तर सामना विकणारी एक गरीब महिला श्रेयस अय्यरला म्हणू लागली की तू मोठा माणूस आहेस, ते तुझे नाव आहे.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित, विराट नाही तर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयनला भारताच्या ‘या’ तरूण खेळाडूचं टेन्शन, इंग्लंडच्या खेळाडूकडून घेतल्या टिप्स

चाहत्यांना ऑटोग्राफ दिल्यानंतर श्रेयस कारच्या दिशेने निघाला तेव्हा ती महिला त्याच्या मागे लागली. यावर श्रेयस म्हणाला, एक मिनिट थांबाल का. थांबा असे सांगून गाडीत बसल्यानंतर चालकाकडून पैसे घेऊन त्याने ते महिलेला दिले. एवढेच नाही तर पैसे मिळाल्यानंतर महिलेने हात मिळवण्यासाठी हात पुढे केला तेव्हा श्रेयस अय्यरने तिला निराश न करता हस्तांदोलन केले आणि नंतर तो निघून गेला. यापूर्वी श्रेयसने अजून एक गरीब व्यक्तीला पैसे दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीलंका दौऱ्यावर फ्लॉप
श्रीलंका दौऱ्यात अय्यर भारताच्या एकदिवसीय संघाचा भाग होता पण त्याची बॅट मात्र शांत होती. तीन सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त ३८ धावा आल्या. पहिल्या सामन्यात त्याने २३ धावांची खेळी केली. दुसऱ्या सामन्यात ७ धावा केल्या होत्या तर तिसऱ्या सामन्यात ८ धावा केल्या. याशिवाय पहिल्याच सामन्यातील श्रेयस अय्यरचा डायरेक्ट थ्रो आणि श्रीलंकेचा खेळाडू धावबाद झाल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.