Shreyas Iyer: आयपीएल २०२४ अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना श्रेयस अय्यरच्या पाठीच्या दुखापतीने पु्न्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आयपीएल २०२४ च्या सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याच्या खेळण्याबाबत निश्चितता नसल्याचे म्हटले जात आहे. वानखेडे स्टेडियमवर रणजी ट्रॉफी फायनलमध्ये दुसऱ्या डावात ९५ धावांची खेळी करताना भारतीय फलंदाजाच्या पाठीची दुखापत पुन्हा सुरू झाली आहे.

रणजी ट्रॉफी २०२४ चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात १० मार्चपासून मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचे अनुभवी आघाडीचे फलंदाजही मुंबईकडून खेळत होते. दुसऱ्या डावात अय्यरची बॅट चांगलीच तळपली. त्याने १० चौकार आणि ३ षटकार लगावत ९५ धावांची झंझावाती खेळी खेळली . पण या खेळीनंतर अय्यरची जुनी दुखापत पुन्हा उफाळून आली, जी त्याच्या आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्ससाठी तणावाची बाब आहे.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Devon Conway Out Of IPL 2024
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे IPL मधून बाहेर
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यर रणजी ट्रॉफी फायनलच्या चौथ्या दिवशी मैदानात न उतरता स्कॅनसाठी रुग्णालयात गेला होता.एवढेच नाही तर ९५ धावांच्या खेळीदरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे त्याने मुंबईच्या फिजिओकडून उपचारही घेतले. त्याच्या पाठीच्या याच दुखापतीवर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया केली होती. रणजी ट्रॉफी फायनलच्या पाचव्या दिवशी आणि २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या सुरुवातीचे सामने तो खेळू शकणार नाही. पाठदुखीमुळे अय्यर या मोसमातील रणजी ट्रॉफीचे दोन सामने खेळू शकला नव्हता.

अय्यरने अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाला माहिती दिली होती. ही दुखापत कोलकाता नाईट रायडर्ससाठी मोठी चिंतेची बाब ठरणार आहे, कारण अय्यर आयपीएलसाठी संघाचा नियमित कर्णधार आहे. संघाचा पहिला सामना २३ मार्च रोजी कोलकाता येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

श्रेयस अय्यर गेल्या वर्षीही दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व नितीश राणाने केले होते. २०२२ मध्ये श्रेयसला कोलकाता संघाचे कर्णधारपद मिळाले होते. पण त्याच्या दुखापतीमुळे त्याला संघाचे नेतृत्त्व करण्याची आणि कर्णधार म्हणून चमकदार करण्याची फारशी संधी मिळाली नाही. श्रेयस अय्यरने २०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून, त्याने १०१ आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये अय्यरने १२५ च्या स्ट्राइक रेटने २७७६ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये अय्यरच्या नावावर १९ अर्धशतके आहेत.