Shreyas Iyer likely to undergo surgery: भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या पाठीच्या दुखापतीवर लवकरच शस्त्रक्रिया होऊ शकते. टीमचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दिवशी बाहेर पडला होता. त्याचवेळी अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेचाही भाग नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लंडनमध्ये किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) जवळच्या देखरेखीखाली त्याच्यावर शस्त्रक्रिया होण्याची अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस अय्यरला शस्त्रक्रियेचा सल्ला –

इंडिया टुडेच्या सूत्रानुसार, मुंबईत तिसऱ्यांदा डॉक्टरांना भेटल्यानंतर त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. सूत्रानुसार, श्रेयस अय्यर शस्त्रक्रियेनंतर सुमारे पाच महिने क्रिकेटपासून दूर असेल, याचा अर्थ जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याचबरोबर ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो सहभागी होऊ शकणार नाही. तसे वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठीही त्याचे संघातील स्थान निश्चित झालेले नाही.

भारतासाठी दुसरा मोठा धक्का –

श्रेयस अय्यरची दुखापत हा भारतासाठी आणखी एक मोठा धक्का आहे. कारण याआधी भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे, जो पाठीच्या समस्येमुळे टी-२० विश्वचषक २०२२ चा भाग होऊ शकला नाही. बुमराह कधी पुनरागमन करेल याची कोणतीही माहिती नसली तरी बीसीसीआय त्याला संघात आणण्याची घाई करणार नाही.

हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: सामना सुरु होताच विराट कोहलीने लुंगी डान्स गाण्यावर धरला ठेका, पाहा VIDEO

अय्यरच्या अनुपस्थितीमुळे आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे, ज्यानी त्याला २०२२ मध्ये १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याचबरोबर त्याला कर्णधार बनवले होते. केकेआरला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याच्यासारखा फलंदाज आणि कर्णधार शोधावा लागेल. अय्यरच्या पाठीची समस्या नवीन नाही. याआधीही तो दुखापतीमुळे बाहेर राहिला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas iyers surgery has come as a shock to the indian team vbm
First published on: 22-03-2023 at 14:51 IST