भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी हैदराबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावा केल्या होत्या. यामध्ये शुबमन गिलच्या द्विशतकाचे योगदान मोलाचे होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ ४२.२ षटकांत ३३७ धावांवर गारद झाला. त्यामुळे भारतीय संघाने १२ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाने शुबमन गिलच्या द्विशतकाचे खास सेलिब्रेशन केले.

भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिलने द्विशतक झळकावत अनेक दिग्गजाचे विक्रम मोडले. त्याचबरोबर त्याने काही नवीन विक्रमही निर्माण केले. शुबमन गिलने सुरुवातील अवघ्या ८७ चेंडूत आपले शतक झळकावले. त्यानंतर १४९ चेंडूचा सामना करताना २०८ धावांची दमदार खेळी, ज्यामध्ये त्याने १९ चौकार आणि ९ गगनचुंबी षटकार लगावले. गिलने आपले विक्रमी द्विशतक पूर्ण करण्यासाठी लॉकी फर्ग्युसनच्या एकाच षटकात सलग ३ षटकार खेचले.

Rohit Sharma Praised and Hugs Yashasvi Jaiswal After Century Video Viral MI vs RR IPL 2024
IPL 2024: ‘गार्डनमध्ये फिरणाऱ्या मुला’च्या शतकानंतर रोहितने मैदानातच घेतली गळाभेट, यशस्वीने रोहितला पाहताच… VIDEO व्हायरल
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: हार्दिक पंड्याने ‘सल्लागार धोनी’ला दिलं चेन्नईच्या विजयाचं श्रेय
Rohit sharma becomes first Indian player to win 250 T20
Rohit Sharma Records: रोहित शर्माच्या नावे अनोखा विक्रम, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला

पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने शुबमन गिलच्या द्विशतकाचे केक कापून सेलिब्रेशन केले. केक कापून झाल्यानंतर टीम इंडिया, कोच आणि इतर सर्व सदस्यांनी त्याच्या खेळीचे कौतुक केले. त्याचबरोबर पुढील प्रवासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच हार्दिक पांड्या, विराट कोहली आणि राहुल द्रविडसह सर्वांनी शुबमन गिलबाबत आपले मनोगत व्यक्त केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा हे पाचवा भारतीय ठरला –

सचिन तेंडुलकर २००* वि. दक्षिण आफ्रिका २०१०
वीरेंद्र सेहवाग २१९ वि. वेस्ट इंडीज २०११
रोहित शर्मा २०९ वि. ऑस्ट्रेलिया २०१३
रोहित शर्मा २६४ वि. श्रीलंका २०१४
रोहित शर्मा २०८* वि. श्रीलंका २०१७
इशान किशन २१० वि. बांगलादेश २०२२
शुबमन गिल २०८ वि. न्यूझीलंड २०२३

सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा फलंदाज (एकदिवसीय आंतरराष्ट्रीय):

१. फखर जमान (पाकिस्तान) – १८ डाव
२. शुबमन गिल (भारत) – १९ डाव
३. इमाम-उल-हक (पाकिस्तान) – १९ डाव
४. व्हिव्हियन रिचर्ड्स (वेस्ट इंडिज) – २१ डाव
५. केविन पीटरसन (इंग्लंड/आयसीसी) – २१ डाव
६. जोनाथन ट्रॉट (इंग्लंड) – २१ डाव
७. क्विंटन डिकॉक (दक्षिण आफ्रिका) – २१ डाव
८. बाबर आझम (पाकिस्तान) – २१ डाव
९. रॅसी व्हॅन डर डुसेन (दक्षिण आफ्रिका) – २१ डाव

एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू –

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा (३ वेळा), वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, इशान किशन यांनी द्विशतके झळकावली आहेत. दरम्यान, द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाजही ठरला आहे. त्याने याबाबतीत इशान किशन आणि रोहित शर्माचा विक्रम मोडला. गिलने २३ वर्षे, १३२ दिवसांत, तर इशानने २४ वर्षे, १४५ दिवसांत आणि रोहितने २६ वर्षे, १८६ दिवसांत ही कामगिरी केली.