भारतात क्रिकेट हा एक धर्म मानला जातो. त्यातही पुरूषांच्या क्रिकेटला अधिक महत्व दिले जाते. त्यामुळे महिला क्रिकेट आणि पुरूष क्रिकेट यांना समान वागणूक व मानधन का मिळत नाही याबाबत कायम चर्चा रंगलेली दिसते. पण याच मुद्द्यावर भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिने महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. पुरूषांच्या क्रिकेटची आणि त्यांच्या मानधनाची तुलना महिला क्रिकेटशी करणे हे अतिशय चुकीचे असल्याचे मत स्मृतीने मांडले आहे.

राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी का?; रवी शास्त्रींनी दिलं भन्नाट उत्तर

काय म्हणाली स्मृती?

BCCI ने नुकतेच भारतीय पुरूष संघाचे वार्षिक करार जाहीर केले. त्यात सर्वात वरिष्ठ श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटींचे मानधन ठरवण्यात आले आहे. पण त्या तुलनेत महिला क्रिकेटला तितके मानधन दिले जात नाही. त्याबाबत बोलताना स्मृती म्हणाली की BCCI ने पुरुष क्रिकेटपटूंसाठी जाहीर केलेल्या वार्षिक कराराप्रणाणेच महिलांनाही सारखे मानधन मिळावे, अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. क्रिकेटला पुरुषांच्या सामन्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आणि नफा मिळतो. त्यामुळे महिलांनाही त्यांच्याप्रमाणेच वार्षिक कराराइतकी रक्कम मिळावी, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. आम्ही मैदानावर खेळताना उत्पन्न आणि नफा याकडे लक्ष देत नाही. आम्ही कायम स्वत:च्या कामगिरीद्वारे भारताला विजय मिळवून देण्याला प्राधान्य देतो.

IND vs NZ : “विराट वेगवान गोलंदाजी कशी खेळतो ते बघू”

T20 World Cup 2020 बद्दल स्मृती म्हणते…

“विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय गेल्या वर्षभरात भारताने टी २० सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्याने विश्वचषकाची तयारी सुरळीतपणे सुरू आहे असे मला वाटते. यावेळी विश्वचषकाच्या जवळपास एका महिन्यापूर्वीच आम्ही ऑस्ट्रेलियात रवाना होणार आहोत. त्यामुळे या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. त्याचप्रमाणे तिंरगी स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यास आम्हाला विश्वचषकापूर्वी संघातील प्रत्येक स्थानावर कोणता खेळाडू योग्य आहे, याचीही जाणीव होईल”, असेही स्मृती स्पष्ट केले.