भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला होता. पुरुष गटात यावर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही प्रकारात पुरस्कार जिंकता आला नाही. भारताच्या एकाही खेळाडूला आयसीसीच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थानही मिळवता आले नाही.

स्मृतीने गेल्या वर्षी २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३८.८६च्या सरासरीने ८५५ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षीही तिने एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली होती. गेले वर्ष भारतीय संघासाठी चांगले गेले नव्हते, पण स्मृतीची बॅट तळपत होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताने घरच्या मैदानावर ८ पैकी फक्त दोनच सामने जिंकले. या दोन्ही सामन्यात संघाच्या विजयात स्मृतीने महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा – “मी त्याच्या जागी असतो तर लग्न केलं नसतं…”, विराटच्या अपयशाला शोएब अख्तरने ठरवले अनुष्काला जबाबदार

पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची आयसीसी प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. हा बहुमान त्याने प्रथमच पटकावला आहे. तसेच शाहीन आफ्रिदी वर्षातील सर्वात तरुण खेळाडू आहे. वयाच्या २१व्या वर्षी त्याने हा मान मिळवला. शाहीनने २०२१ मध्ये ३६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि ७८ बळी घेतले. ५१ धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

इंग्लंडचा कसोटी कप्तान जो रूटला आयसीसीचा कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर (पुरुष) म्हणून घोषित करण्यात आले. त्याने गेल्या वर्षी १५ कसोटी सामन्यांमध्ये ६ शतकांच्या मदतीने १७०८ धावा केल्या होत्या. रूटने या पुरस्कारासाठी भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनसह ३ खेळाडूंना मागे सोडले. श्रीलंकेचा कसोटी कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसन हेही बक्षीसाच्या शर्यतीत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर बाबर आझम २०२१मधील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू (पुरुष) ठरला. गेल्या वर्षी ६ वनडे सामन्यात २ शतकांच्या मदतीने बाबरने ४०५ धावा केल्या होत्या. त्याने बांगलादेशचा शाकिब अल हसन, आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान यांना मागे टाकले.