भारताच्या पाचव्या मानांकित स्नेहल मानेने कुमारांच्या मॉरिशस खुल्या टेनिस स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी घातली. या मोसमातील दुसऱ्या आठवडय़ातील तिचे हे दुसरे विजेतेपद आहे.
पुण्यातील १६ वर्षीय स्नेहलने अंतिम फेरीत सहावी मानांकित अॅमेली बोय हिच्यावर ६-३, ६-० असा सफाईदार विजय मिळवला. तिने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्र्हिस ब्रेक नोंदविला. हे ब्रेक नोंदविताना तिने पासिंग शॉट्सचा सुरेख खेळ केला. दुसऱ्या सेटमध्ये तिने केलेल्या वेगवान खेळापुढे अॅमेली हिचा बचाव निष्प्रभ ठरला. या सेटमध्ये स्नेहलने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा प्रभावी उपयोग केला. तिने विजेतेपदाबरोबरच ३० मानांकन गुणांची कमाई केली. याआधी तिने मॉरिशसमध्ये झालेल्या पेटिट कॅम्प चषक स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते. त्या स्पर्धेत तिने ४० मानांकन गुण मिळवले होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2015 रोजी प्रकाशित
टेनिस : स्नेहल मानेला विजेतेपद, मॉरिशस खुल्या टेनिस स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी
तिने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्र्हिस ब्रेक नोंदविला.
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 06-09-2015 at 02:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snehal manela win in the tennis match