झंझावती खेळाचा प्रत्यय घडवत भारताच्या सोमदेव देववर्मनने दिल्ली खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. त्याने चीनच्या देई वुईचा ६-२, ६-२ असा दारुण पराभव केला.वुई हा चीनचा अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. त्यामुळे तो सोमदेवला कडवी लढत देईल अशी अपेक्षा होती. मात्र सोमदेवच्या आक्रमक खेळापुढे त्याचा बचाव खूपच निष्प्रभ ठरला. सोमदेव याला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झेई झांग याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. सामना जिंकल्यानंतर सोमदेव म्हणाला, ‘‘सामन्याचा निकाल पाहता हा सामना मी एकतर्फी जिंकला असे वाटत असेल. पण वुईने खूप छान खेळ केला व मला गुण मिळविण्यासाठी झुंजविले. फक्त निर्णायक क्षणी मी चांगला खेळ केला. त्याला मात्र अपेक्षेइतके कौशल्य दाखविता आले नाही.’’
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2014 रोजी प्रकाशित
सोमदेव उपांत्यपूर्व फेरीत
झंझावती खेळाचा प्रत्यय घडवत भारताच्या सोमदेव देववर्मनने दिल्ली खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.
First published on: 20-02-2014 at 04:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Somdev cruises into quarters of atp delhi open