भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या एकेरीच्या
मुख्य फेरीत धडक मारली आहे. सोमदेवने पात्रता फेरीच्या तिसऱ्या सामन्यात
अमेरिकेच्या आठव्या मानांकित वेन ओडेस्निक याचा ६-३, ६-४ असा पराभव करून
मुख्य फेरीत स्थान मिळवले. सोमदेवला मुख्य फेरीतील सलामीच्या सामन्यात
स्पेनच्या डॅनियल मुनोझ-डे ल नावा याच्याशी लढत द्यावी लागेल. सोमदेवने याआधी
पात्रता फेरीच्या दोन्ही लढतींत सुरेख कामगिरीचे प्रदर्शन केले होते. त्याने पहिल्या
सामन्यात इटलीच्या मट्टेओ व्हिओला याचा ६-४, १-६, ६-४ असा पराभव केला होता.
त्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात फ्रान्सच्या क्वेन्टिन हलेस याच्यावर ७-६, ६-३ अशी
मात केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2013 रोजी प्रकाशित
सोमदेव देववर्मन मुख्य फेरीत
भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या एकेरीच्या मुख्य फेरीत धडक मारली आहे. सोमदेवने पात्रता फेरीच्या तिसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या आठव्या मानांकित वेन ओडेस्निक याचा ६-३, ६-४ असा पराभव करून मुख्य फेरीत स्थान मिळवले.
First published on: 25-05-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Somdev through to main draw of french open