Soumya Sarkar and Harshit Rana Argument Video Viral: उदयोन्मुख आशिया चषक २०२३ च्या उपांत्य फेरीत शुक्रवारी भारत अ आणि बांगलादेश अ संघाचा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने ५१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, यासामन्यादरम्यान बांगलादेशचा स्टार फलंदाज सौम्या सरकारचा भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणासोबत वाद झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आऊट झाल्यानंतर सौम्या सरकार भडकला –

ही घटना बांगलादेशच्या डावातील २६व्या षटकात घडली. युवराज सिंग डोडियाच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार सौम्या सरकारने चौकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सौम्या सरकारने पुन्हा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला निकिन जोशच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर जोशने वेगवान गोलंदाज हर्षितसोबत सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. पण सौम्या सरकारला त्यांचे हे सेलिब्रेशन फारसे रुचले नाही.

दोघांमधील वादावादी वाढत गेली –

सौम्या सरकार आऊट झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन सुरु केले. हे पाहून सौम्या सरकार भडकला आणि तो हर्षितला काहीतरी म्हणाला. ज्यानंतर वेगवान गोलंदाज हर्षित राणाला म्हणाला की तो फक्त सेलिब्रेशन करत आहे. यानंतर दोघांमधील वादावादी वाढत गेली आणि शाब्दिक युद्ध अधिक तीव्र झाले. दरम्यान कर्णधार यश धुलने येऊन हर्षितला शांत केले तर साई सुदर्शनने सौम्या सरकारला शांत करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs WI: अश्विनने व्हीव्हीएस लक्ष्मणला मागे टाकत केला विक्रम, ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा भारतीय खेळाडू

भारताने ५१ धावांनी सामना जिंकत अंतिम फेरी गाठली –

या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताचा भारताचा डाव २११ धावांत आटोपला. यामध्ये कर्णधार यश धुलने ८५ चेंडूत ६६ धावांचे योगदान दिले. त्यानंतर २१२ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या बांगालदेश संघाचा डाव भारताच्या फिरकीसमोर १६० धावांवर गारद झाला. डावखुरा फिरकी गोलंदाज निशांत सिंधूने २० धावा देत पाच बळी घेतले. तत्पूर्वी, पाकिस्तान अ संघाने पहिल्या उपांत्य फेरीत श्रीलंका अ संघाचा ६० धावांनी पराभव करून