ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया पार पडत आहे. या स्पर्धेत भारताने २ सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज के. एल. राहुल यांनी निराशजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचेल का? अशी साशंकता निर्माण झाली आहे. यावर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

“भारतीय संघाने एक सामना गमावला आहे. प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघ अंतिम सामना खेळेल, अशी मला आशा आहे. संघाला उपांत्य फेरीत जाऊद्या, मग ते शेवटचे दोन सामने खेळतील,” असा विश्वास सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : आता पाकिस्तान जिंकणं अशक्यच पण.. IND vs SA नंतर शोएब अख्तर यांची टीम इंडियावर कटू टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत तीन सामने खेळले आहेत. त्यातील एक सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघाला पुढील दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. तरच, भारत अंतिम सामन्यात धडक मारू शकतो. बांग्लादेश आणि झिम्बाब्बे बरोबर भारताची लढत होणार आहे.