Gerald Coetzee Reprimanded By ICC: भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्याच नुकतीच ४ सामन्यांची टी-२० मालिका आफ्रिकेत खेळवली गेली. या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला. पण या मालिकेनंतर आता अचानक आयसीसीने दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कुत्सिया याला शिक्षा ठोठावली आहे. आयसीसीने या खेळाडूला त्याच्या गैरवर्तनाबद्दल शिक्षा दिली आहे. कुत्सियाला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यातील चुकीमुळे शिक्षा देण्यात आली आहे.

चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. सामन्यातील डावाच्या १५व्या षटकात गेराल्ड कुत्सियाने वाईड बॉल टाकला. अंपायरने बॉल वाईड घोषित करताच कुत्सिया संतापला. त्याने या निर्णयावर नाराजी दर्शवली आणि पंचांनाही सुनावलं आणि हिच चूक त्याला महागात पडली. पंचांच्या निर्णयावर अशा प्रकारे नाराजी व्यक्त करणे नियमांच्या विरोधात आहे.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Gautam Gambhir Angry on Morne Morkel in Australia for turning up late at training IND vs AUS
Team India: गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मॉर्ने मॉर्कलवर संतापला, नेमकं काय घडलं होतं? प्रकरण आलं समोर
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?

हेही वाचा – संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO

आयसीसीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, गेराल्ड कुत्सिया खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट स्टाफशी संबंधित ICC आचारसंहितेच्या नियम २.८ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. कोएत्झीला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. त्याने लेव्हल 1 चा गुन्हा केला. मॅच फीच्या दंडासोबतच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जमा होईल.

लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी किमान शिक्षा ही खेळाडूच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड आणि त्याच्या खात्यात एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स जोडले जातात. जेव्हा एखादा खेळाडू २४ महिन्यांच्या कालावधीत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट गुणांवर पोहोचतो तेव्हा त्याचे निलंबन गुणांमध्ये रूपांतर केले जाते आणि खेळाडूवर बंदी घातली जाते.

हेही वाचा – IND vs AUS: भारतीय संघ पर्थ कसोटीत फिरकीपटू म्हणून फक्त अश्विनलाच देणार संधी, काय आहे कारण?

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत गेराल्ड कुत्सियाला फारशी कामगिरी करता आली नाही. चार टी-२० सामन्यात त्याने फक्त चार विकेट घेतल्या. आतापर्यंत त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत १० आणि एकदिवसीय सामन्यात ३१ विकेट आहेत.

संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांनी टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी केली. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया मालिका जिंकण्यात यशस्वी ठरली. तिलक वर्माने मालिकेत दोन शतकांसह एकूण २८० धावा केल्या आणि त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

Story img Loader