हशिम अमलाच्या दमदार फलंदाजीच्या बळावर किंग्समेडे येथे दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात सहा विकेट्स राखून शानदार विजय नोंदवला. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सन (४२) आणि मार्टिन गप्तिल (४२) यांनी ६८ धावांची सलामी दिली, परंतु त्यानंतर त्यांचे सात फलंदाज ४९ धावांत गारद झाले. त्यामुळे २० षटकांत त्यांना ८ बाद १५१ धावा करता आल्या. मग अमलने ४८ धावांची खेळी उभारताना ए बी डी’व्हिलियर्स आणि रिली रोसोऊ यांच्यासोबत दोन अर्धशतकी भागीदाऱ्या रचल्या. संघाला विजयासाठी पाच धावांची गरज असताना अमला बाद झाला.