क्रिकेटचं मैदान गाजवणारे खेळाडू हे त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत येतात. सध्या असाच एक चर्चेत असलेला खेळाडू म्हणजे केशव महाराज. दक्षिण अफ्रिकेचा हा खेळाडू त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आहे. तसंच तो चर्चेत असण्यामागचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे त्याची पत्नी लेरीशा. लेरीशा आणि केशव महाराज या दोघांनीही गेल्या वर्षी लग्न केलं. केशव महाराजची पत्नी लेरीशा ही दिसायला खूपच सुंदर आहे. तसंच ती कथ्थक डान्सरही आहे.
केशव क्रिकेटकडे कसा वळला?
केशवचे वडील आत्मानंद महाराज हेही क्रिकेटपटू होते. दक्षिण आफ्रिकेतल्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते खेळायचे पण देशासाठी खेळू शकले नाहीत. केशवच्या क्रिकेट आवडीला त्यांनी प्रोत्साहन दिलं.
क्वा झुलू नाताल हा दक्षिण आफ्रिकेतल्या डोमेस्टिक क्रिकेटमधला अग्रणीचा संघ. केशवही त्याच संघाकडून खेळला. दक्षिण आफ्रिकेतल्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना पोषक असतात. त्यामुळे वेगवान गोलंदाज होणं साहजिक पण केशवने फिरकीवर लक्ष केंद्रित केलं. योगायोग म्हणजे केशवने ऑस्ट्रेलियातल्या चेंडूला सर्वाधिक उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर अर्थात पर्थ इथे कसोटी पदार्पण केलं. ४९ कसोटी, ३४ वनडे आणि २६ ट्वेन्टी२० सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.
केशव महाराजची पत्नी लेरीशा आहे कथ्थक डान्सर
डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजची पत्नी लेरीशा कथ्थक डान्सर आहेत. तसंच हे दोघंही भारतीय वंशाचे आहेत. लेरीशा तिच्या कथ्थक डान्सचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल करत असते.

लेरीशा आणि केशव महाराज यांची ओळख कशी झाली?
केशव महाराज आणि लेरीशा यांची ओळख त्यांच्यातल्या कॉमन मित्रांमुळे झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. दोघांनीही एकमेकांकडे प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर आपल्या कुटुंबीयांना कल्पना दिली. मागच्या वर्षीच या दोघांचा विवाह झाला आहे. लेरीशाचे आणि केशवचे फोटोही व्हायरल होत असतात.
केशव महाराजच्या लग्नाचे फोटो या दोघांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आहेत. लग्न सोहळ्याच्या फोटोंना केशव महाराजने कॅप्शन दिलं आहे की, “आमच्या आयुष्यातला हा आनंदी दिवस आहे. हे फोटो शेअर करताना खूप आनंद होतो आहे.” लेरीशा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर ४९.५ K फॉलोअर्स आहेत.