“प्रिय महेंद्रसिंह धोनी तू…”; तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा CSKच्या कर्णधाराला खास संदेश

एमके स्टॅलिन यांनी शनिवारी महेंद्रसिंह धोनीला विशेष संदेश देऊन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या चाहत्यांची मने जिंकली.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शनिवारी महेंद्रसिंह धोनीला विशेष संदेश देऊन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या चाहत्यांची मने जिंकली. CSK च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२१ च्या विजेतेपदाच्या सोहळ्यात ते बोलत होते. CSK ने गेल्या महिन्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून IPL २०२१ चे विजेतेपद पटकावले.

 या समारंभात बोलताना एमके स्टॅलिन म्हणाले, “प्रिय महेंद्रसिंह धोनी, तू अनेक सीझनसाठी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे. धोनी तू झारखंडचा आहेस पण आमच्यासाठी, तामिळनाडूच्या लोकांसाठी तू आमच्यापैकी एक आहेस”.

मुख्यमंत्री स्टॅलिन धोनीचे चाहते

स्टॅलिन म्हणाले, “मी येथे तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून नाही तर धोनीचा चाहता म्हणून आलो आहे. केवळ मीच नाही तर येथे उपस्थित असलेली माझी नातवंडेही त्याचे चाहते आहेत. माझ्या दिवंगत वडिलही धोनीचे चाहते होते. मी धोनीला आवाहन करतो की, आता निवृत्तीचा विचार करू नका कारण आम्हाला त्याला पुढील अनेक वर्षे चेन्नईच्या कर्णधारपदी पहायचे आहे.”

धोनी म्हणाला, मी नेहमी माझ्या खेळाची योजना बनवत असतो. त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना जन्मगावी रांची येथे खेळल्याचे सांगितले. तो म्हणाला, “आशा आहे की माझा शेवटचा टी -२० सामना चेन्नईतच होईल. तो पुढच्या वर्षी होईल की पुढच्या पाच वर्षात, हे माहित नाही.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Special message from tamil nadu chief minister mk stalin to the csk captain ms dhoni srk

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या