ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मुलीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. पेले हा केवळ ब्राझीलमधीलच नव्हे तर जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. कोलन कॅन्सरमुळे त्यांना काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी त्याच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा जगत शोकसागरात बुडाले असून, फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीपासून ते क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. १९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.

हेही वाचा – ब्राझील फुटबॉलपटू पेले यांचा जीवनप्रवास पाहायचा आहे का? नेटफ्लिक्सवरील ‘हा’ बायोपिक नक्की पाहा

तीन विश्वचषक जिंकण्याचा विक्रम करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. ब्राझीलकडून खेळताना त्यांनी १९५८, १९६२ आणि १९६० मध्ये संघाला चॅम्पियन बनवले. विश्वचषकात त्यांचे ७७ गोल आहेत. फुटबॉलच्या जगात पेले यांना ब्लॅक पर्ल आणि ब्लॅक डायमंड म्हणूनही ओळखले जात होते. आजच्या फुटबॉलच्या जगात मेस्सी आणि क्रि रोनाल्डोसारखे फुटबॉलपटू राज्य करत आहेत, परंतु अनेक चाहते अजूनही पेले यांना GOAT मानतात.

आणखी वाचा – विश्लेषण: पेले… फुटबॉलमधील अद्भुत दंतकथा!

खरं तर, माजी फुटबॉलपटू केमोथेरपी घेत होते, परंतु कर्करोगाशी त्यांचा लढा अपयशी ठरला. ते कोलनमुळे मरण पावले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना श्वासोच्छवासाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पेले नियमित रुग्णालयात उपचार घेत होते.आता त्यांनी फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंतच्या अनेक खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा – दुःखद बातमी ! ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे ८२ व्या वर्षी कॅन्सरने निधन

ब्राझिलियन आणि पॅरिस सेंट-जर्मेन सुपरस्टार नेमारने आपल्या देशाच्या महान खेळाडूला श्रद्धांजली अर्पण करताना लिहिले, ”पेलेच्या आधी, १० ही फक्त एक संख्या होती परंतु ते सुंदर वाक्य अपूर्ण आहे. मी म्हणेन की पेलेपूर्वी फुटबॉल हा फक्त एक खेळ होता, ज्याचे त्याने कलेमध्ये रूपांतर केले. मनोरंजनाने भरलेले… फुटबॉल आणि ब्राझील हे नाव किंग (पेले) मुळे मिळाले. पण त्याची जादू कायम राहील.”

अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता लिओनेल मेस्सीने आपल्या पोस्टमध्ये पेलेला श्रद्धांजली अर्पण केली आहे. यादरम्यान त्याने दोघांचा एक फोटोही शेअर केला आहे.

त्याचवेळी रोनाल्डोनेही पेले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहाने देखील पेले श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने त्यांचा एक फोटो शेअर केला आहे.

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने देखील ट्विटरवरुन पेले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports world mourns peles death tributes have been paid by players from football to cricket vbm
First published on: 30-12-2022 at 09:31 IST