IPL 2024, Punjab Kings vs Sunrisers Hyderabad: पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुल्लानपूर येथे सामना खेळवला जात आहे. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत ९ बाद १८२ धावा केल्या. पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सामन्याच्या सुरूवातीला हा निर्णय अगदी योग्य ठरला. पंजाबने शानदार सुरूवात करत हैदराबादला एकामागून एक धक्के दिले. प्रत्येक विकेट कमाल होती पण राहुल त्रिपाठीच्या विकेटमागे सॅम करनच्या चालाखीची वाहवा केली जात आहे.

– quiz

Brett Lee on Jasprit Bumrah
T20 WC 2024 : ‘जसप्रीत बुमराह बर्फातही गोलंदाजी करू शकतो’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
Indian Premier League Cricket Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: हैदराबादच्या फलंदाजांचा कस! ‘क्वॉलिफायर२’मध्ये आज फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर राजस्थानशी लढत
Virat Needs 29 runs to reach 8000 runs complete in IPL history
RR vs RCB : एलिमिनेटर सामन्यात विराट इतिहास रचण्यासाठी सज्ज! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिलाच खेळाडू
Yash Dayal redemption Father recalls taunts
IPL 2024 : ‘आरसीबीने पैसा वाया घालवला…’, बंगळुरुच्या विजयानंतर यशच्या वडिलांचा टीकाकारांबद्दल खुलासा
Yash Dayal's video call to his mother after the win
IPL 2024 : ‘आता तुला कसं वाटतयं आई?’, आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतर यश दयाल व्हिडीओ कॉलवर भावूक
Jitesh Sharma Punjab Kings New Captain for SRH against match
SRH vs PBKS : पंजाब किंग्सचा नवा कर्णधार नियुक्त, शिखर-सॅमनंतर आता विदर्भाचा ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व
MS Dhoni's surprise visit to RCB dressing room
VIDEO: RCB vs CSK सामन्यापूर्वी एमएस धोनी गेला आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये, पाहा नेमकं करतोय तरी काय
Riyan Parag complete 500 runs in IPL 2024
RR vs PBKS : २२ वर्षीय रियान परागचा मोठा पराक्रम! मिचेल मार्श आणि सूर्यकुमार यादवच्या खास क्लबमध्ये झाला सामील

पंजाब किंग्जकडून वेगवान गोलंदाज हर्षल पटेल सनरायझर्स हैदराबादच्या डावातील १०वे षटक टाकत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुल त्रिपाठी स्ट्राइकवर होता. हर्षलने त्रिपाठीला बाउन्सर टाकला. राहुलला त्या चेंडूवर अप्पर कट मारायचा होता. पण तो चेंडूला वेळ देऊ शकला नाही आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट कीपरच्या हातात गेला. पण गोलंदाजाने कोणतंच अपील केलं नाही. इतर खेळाडूंनीही फारसा रस दाखवला नाही. पण सॅम करनने मात्र इथे मोठी भूमिका बजावली.

सॅम करनने कर्णधार शिखर धवनला त्रिपाठी बाद असल्याचे सांगत रिव्ह्यू घेण्यास सांगितले. गब्बरनेही तेच केले. करनच्या सांगण्यावरून त्याने डीआरएस घेतला. त्यानंतर चेंडू राहुलच्या बॅटची कड घेऊन जितेश शर्माकडे गेल्याचे मोठ्या पडद्यावर स्पष्टपणे दिसले. अशातच करनच्या हुशारीमुळे पंजाबला राहुलची विकेट मिळाली. राहुल त्रिपाठी १४ चेंडूत केवळ ११ धावा करून बाद झाला.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या डावाची सुरुवात फारशी चांगली करता आली नाही. संघाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज एकामागून एक माघारी परतले. मात्र यानंतर युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीच्या ३७ चेंडूत ६४ धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर नऊ विकेट्सवर १८२ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. पंजाब किंग्जकडून डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने २९ धावांत चार विकेट घेतले. हर्षल पटेल आणि सॅम करन यांनी प्रत्येकी दोन तर कागिसो रबाडाला एक विकेट मिळाली, तरीही सनरायझर्स हैदराबादने स्पर्धात्मक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले.