२०२० वर्षात भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाहीये. श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-२० सामना पाऊस आणि खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिला चेंडू टाकण्याच्या आधीच गुवाहटीत पावसाला सुरुवात झाल्यामुळे, सामना सुरु करण्यास विलंब झाला. काही कालावधीनंतर पावसाने उसंत घेतली, मात्र खेळपट्टीवरचा काही भाग ओलसर राहिला होता. हा भाग सुकवण्यात मैदानातील कर्मचाऱ्यांना अपयश आल्यामुळे अखेरीस पंचांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतला दुसरा सामना मंगळवारी इंदूरच्या मैदानावर खेळवला जाईल.
ओलसर खेळपट्टी सुधरवण्यात मैदानातील कर्मचाऱ्यांना अपयश
९ वाजता पंच खेळपट्टीची पाहणी करणार, सामना सुरु होण्यास आणखी विलंब
कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी झाकली, सामना सुरु होण्यासाठी विलंब होण्याची शक्यता
नवीन वर्षाच्या पहिल्या सामन्यातही संघ व्यवस्थापनाचा पंतवर विश्वास कायम