बिग बॅश लीग (BBL 2022) मध्ये एकापाठोपाठ एक वादग्रस्त दृश्ये समोर येत आहेत. अलीकडेच एका झेलवरून बराच गदारोळ झाला होता. आता आणखी एका सामन्यात मांकडिग धावबादवरून वाद झाला. खरं तर, मंगळवारी रेनेगेड्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अ‍ॅडम झाम्पाने रेनेगेड्सचा फलंदाज टॉम रॉजर्सला मांकडिगने बाद करण्याचा प्रयत्न केला. ही घटना २० व्या षटकात पाहिला मिळाली.

पंचाने बाद दिले नाही –

वास्तविक, एमसीजी येथे मेलबर्न स्टार्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात सामना खेळला जात होता. स्टार्स संघाकडून डावातील शेवटचे षटक अ‍ॅडम झाम्पा टाकत होता. या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी झाम्पा येताच नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभा असलेला टॉम रॉजर्स क्रीझच्या पुढे गेला. झाम्पाने रॉजर्सला पुढे येताना पाहिले तेव्हा चेंडू टाकायच्या आधी त्याने गल्लीत चेंडूने बेल्स पाडल्या.
यानंतर रॉजर्स पॅव्हेलियनकडे परतायला लागला, पण तितक्यात मैदानी पंचाने हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवला. त्यामुळे झाम्पा आणि पंच यांच्यात थोडा वेळ संभाषण झाले. शेवटी फलंदाजाला नाबाद घोषित करण्यात आले. अंपायरच्या निर्णयाने झाम्पा खूपच आश्चर्यचकित झालेला दिसला.

नियम काय सांगतो –

हेही वाचा – IND vs SL T20 Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात कोणाचे पारडे आहे भारी? जाणून घ्या काय सांगते आकडेवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मांकडिगच्या नियमानुसार, जर फलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकरच्या टोकावरून क्रीज सोडली आणि तो धावबाद झाला, तर तो नियमानुसार आहे, पण यात एक पेच आहे. वास्तविक, झाम्पाने केलेल्या धावबादचा विचार केला गेला नाही. कारण पंचांनी असे मानले की झाम्पाने गोलंदाजीसाठी त्याचा हात पूर्णपणे फिरवला (अ‍ॅक्शन) होता. म्हणजेच त्याने चेंडू फेकण्याचे पूर्ण अ‍ॅक्शन केली होती.