आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) यंदाचे वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला यंदाच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले, तर द.आफ्रिकेचा कर्णधार ए बी डीव्हिलियर्सला सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूचा मान मिळाला आहे. स्टीव्हन स्मिथलाच मानाच्या गॅरी सोबर्स चषकानेही सन्मानित करण्यात आले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान देखील द.आफ्रिकेच्या खेळाडूने पटकावला. आफ्रिकेच्या फॅफ डू प्लेसिस याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाच्या वर्षातील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याला देण्यात आला, तर न्यूझीलंडच्या ब्रेण्डन मॅक्क्युलमला ‘आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट’चा बहुमान मिळाला. दरम्यान, या पुरस्काराच्या यादीत भारताच्या एकाही खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही. महिला क्रिकेटपटूंमध्ये यंदाची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगची निवड करण्यात आली, तर ट्वेन्टी-२० साठी वेस्ट इंडिजच्या स्टॅफिनी टेलरला सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट पंच म्हणून रिचर्ड केटलबर्ग यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
Here is the full list of all 10 #ICCAwards 2015 winners! MORE – https://t.co/kYJj4jtHuM pic.twitter.com/39MsEFsBZm
— ICC (@ICC) December 23, 2015