ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या कामगिरीत अशाच प्रकारचे सातत्य टीकवले तर तो नक्कीच भविष्यात सचिन तेंडुलकरलाही मागे टाकेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने व्यक्त केला. २७ वर्षीय स्मिथने भारतीय संघाविरुद्धच्या धरमशाला कसोटीत आपले २० वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक पूर्ण केले. स्मिथ सध्या दमदार फॉर्मात आहे. हॉजने फॉक्स स्पोर्ट्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत स्टीव्ह स्मिथवर कौतुकाचा वर्षाव केला. स्मिथ अशाच प्रकारे खेळत राहिला तर तो नक्कीच ४० ते ५० शतकं ठोकू शकतो. स्मिथ सध्या खूप उत्तम दर्जाचा खेळाचा नजराणा पेश करत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मागे स्मिथच्या नावावर एका शतकाची नोंद आहे. याच पद्धतीने स्मिथ वयाच्या ३५ व्या वर्षापर्यंत खेळत राहिला तर तो नक्कीच नव्या विक्रमाची नोंद करू शकतो, असे हॉजने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसोटी विश्वात सचिन तेंडुलकरच्या नावावर २०० कसोटी सामन्यांमध्ये ५१ कसोटी शतकांचा विक्रम जमा आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा जॅक कालिसने ४५ कसोटी शतकं ठोकली आहेत, तर रिकी पॉन्टींगच्या नावावर ४१ कसोटी शतकं जमा आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Steve smith can break sachin tendulkar record brad hodge
First published on: 27-03-2017 at 11:40 IST