‘‘भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षकापेक्षा चांगल्या सल्लागाराची आवश्यकता आहे,’’ असे मत भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. भारताचे माजी कसोटीपटू माधव आपटे यांच्या ‘अ‍ॅझ लक वुड हॅव इट’ या पुस्तकाचे प्रकाशन गावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
डंकन फ्लेचर यांचा करार संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयकडून प्रशिक्षकाची शोधमोहीम सुरू आहे. गावस्कर म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळताना तुम्हाला सल्लागाराची आवश्यकता असते. कनिष्ठ स्थरावर किंवा कारकीर्दीची सुरुवात करताना प्रशिक्षक लागतो. उच्चस्तरावर खेळताना तुमच्या पाठीवर हात ठेवून मार्गदर्शन करणारा सल्लागार हवा.’’