Suryakumar Yadav Orange Watch Price: आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली संघ खेळताना दिसणार आहे. १५ सदस्यीय संघामध्ये शुबमन गिल संघाचा उपकर्णधार असणार आहे. आशिया चषकासाठी निवडलेल्या खेळाडूंची घोषणा पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली, ज्यामध्ये मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित होते.
सूर्या आणि अजित आगरकर दोघांनीही खेळाडूंची नावे सांगितली आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. पण त्याच दरम्यान, नजर सूर्यकुमार यादवच्या मनगटावरील घड्याळावर गेली. त्याच्या घड्याळाचा रंग केशरी होता, पण त्याची किंमतही चाहत्यांना चकित करणारी आहे.
सूर्यकुमार यादवच्या केशरी घड्याळाची नेमकी किंमत किती?
सूर्यकुमार यादवच्या मनगटावरील घड्याळाचा फोटो व्हायरल होत असून या घड्याळाची नेमकी किंमत किती आहे, जाणून घेऊया. टीम इंडियाच्या टी-२० कर्णधाराने पत्रकार परिषदेसाठी घातलेले घड्याळ जेकब अँड कंपनीचे होते. सूर्यकुमार यादवचं घड्याळ जेकब अँड कंपनीच्या राम जन्मभूमी टायटॅनियम एडिशनचे आहे, ज्याचा पट्टा भगव्या रंगाचा आहे. याचबरोबर या घड्याळावर राम मंदिर, राम आणि हनुमान देखील आहेत.
सूर्यकुमार यादवने घातलेलं हे घड्याळ खास पुरूषांसाठी तयार करण्यात आलं आहे आणि भारतीय ग्राहकांना विचारात घेऊन बनवण्यात आलं आहे. हे घड्याळ १०० टक्के वॉटरप्रूफ आहे. त्याचबरोबर लिमिटेड एडिशन घड्याल असून २ वर्षांची वॉरंटी आहे. हे घड्याळ बनवणारी ही कंपनी स्वित्झर्लंडची आहे. भारतीय मार्केटमध्ये या घड्याळाची किंमत ३४ ते ६५ लाख रुपये आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ ९ सप्टेंबरपासून आशिया चषकामध्ये खेळताना दिसणार आहे. आशिया चषकासाठी निवडलेले खेळाडू ३-४ दिवस आधीच युएईसाठी रवाना होणार आहेत. भारत आशिया चषक स्पर्धेचा गतविजेता आहे आणि सूर्यकुमार यादवसमोर सर्वात मोठे आव्हान असणारे विजेतेपद राखणे.
भारताचा आशिया चषक २०२५ साठी संपूर्ण संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह
राखीव खेळाडू
प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, रियान पराग