Duleep Trophy 2024 Rishabh Pant and Kuldeep Yadav Funny Video Viral : भारतीय क्रिकेट संघाचे अनेक स्टार खेळाडू सध्या खेळल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये खेळताना दिसत आहेत, ज्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि कुलदीप यादव देखील उपस्थित आहेत. ऋषभ पंत भारत ब संघाचा भाग आहे आणि कुलदीप यादव भारत अ संघाचा भाग आहे. दोन्ही संघात खेळला गेलेला सामना ऋषभच्या भारत ब संघाने ७६ धावांनी जिंकला. दरम्यान या सामन्यातील ऋषभ-कुलदीपचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऋषभ कुलदीपला आईची शपथ घ्यायला सांगताना दिसत आहे.

दुलीप ट्रॉफीमधील दोन्ही भारतीय स्टार्सचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही गोंधळून जाल की हे व्यावसायिक क्रिकेट आहे की गल्ली क्रिकेट? सामन्यादरम्यान पंतने कुलदीपला गल्ली क्रिकेटपटूप्रमाणे शपथ घेण्यास सांगितले. व्हायरल व्हिडीओमध्ये विकेट कीपिंग करताना पंत असे म्हणताना ऐकू येत आहे की, “तो सिंगल घेण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन तयार रहा.”

IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Rohit Sharma Statement on India win Over Bangladesh in Kanpur Test IND vs BAN
IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Rishabh Pant Explains Why he Set Bangladesh Filed in IND vs BAN Chennai Test
IND vs BAN: “…म्हणून मी बांगलादेशची फिल्डिंग सेट केली”, ऋषभ पंतने अजय जडेजाचा उल्लेख करत दिलं मनं जिंकणारं उत्तर
IND vs BAN Rohit Sharma Hits Shubman Gill on His Jaw Video Viral
VIDEO: रोहितने बोलता बोलता मुद्दाम शुबमनला मारलं, विराटने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतंय सांगताच कॅप्टनने पाहा काय केलं?
IND vs BAN Rishabh Pant sets Bangladesh fielding video viral
IND vs BAN : ऋषभ पंतने फलंदाजी करताना सेट केली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO पाहून आवरता येणार नाही हसू
IND vs BAN Adam Gilchrist on Rishabh Pants comeback
IND vs BAN : ‘ऋषभ पंतचे कसोटीतील पुनरागमन हे क्रिकेटच्या इतिहासातील…’, ॲडम गिलख्रिस्टचे वक्तव्य

ऋषभ पंतचे हे वाक्य ऐकल्यानंतर फलंदाजी करत असलेला कुलदीप म्हणतो, “मी सिंगल घेणारच नाही.” कुलदीपचे हे उत्तर ऐकून ऋषभ त्याला म्हणतो, “आईची शपथ घेऊन सांग, सिंगल घेणार नाही.” पंत आणि कुलदीपच्या मजेशीर संवादाने चाहत्यांनाा गल्ली क्रिकेटची आठवण दिली. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Paralympics 2024: ७ सुवर्ण, एकूण २९ पदकांसह पॅराखेळाडूंची पॅरिस मोहीम फत्ते

सामन्याबद्दल बोलायचे तर शेवटच्या दिवशी २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारत अ संघाने शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल या सलामीवीरांच्या विकेट्स लवकर गमावल्या. पण केएल राहुल आणि रियान पराग यांनी महत्त्वाच्या धावा करत सामन्यात टिकून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. केएल राहुल १२१ चेंडूत ५७ धावा करत सर्वाधिक धावा करणारा ठरला. त्यानंतर आकाश दीप सिंगने ४३ धावांची जलद खेळी खेळली. मात्र, इतर फलंदाज भारत ब संघाच्या वेगवान गोलंदाजीविरुद्ध अपयशी ठरले.

दिवसाच्या पहिल्या सत्रात भारत ब संघ दुसऱ्या डावात १८४ धावांत आटोपला आणि एकूण २७४ धावांची आघाडी घेतली. मयंक अग्रवाल (३ धावा) दुसऱ्याच षटकात बाद झाल्याने भारत अ संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रियान पराग (३१ धावा) क्रीझवर आला आणि त्याने शुबमन गिल (२१ धावा) सोबत ४८ धावांची भागीदारी केली. शुबमन गिल बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल खाते न उघडता बाद झाला.

हेही वाचा – Bajrang Punia Threat : ‘बजरंग काँग्रेस सोड अन्यथा…’, बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी; FIR दाखल

लंच ब्रेकवेळी त्यांची धावसंख्या ४ विकेट्सवर ७६ धावा होती, जी शिवम दुबे आणि तनुष कोटियन बाद झाल्यानंतर लवकरच ६ विकेट्स ९९ धावा अशी झाली. राहुलने १८० मिनिटे फलंदाजी करताना १२१ चेंडूंचा सामना केला. त्याने कुलदीप यादव (१४) सोबत सातव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी करून संघाचा पराभव काही काळासाठी टाळला. आकाश दीपने खालच्या फळीत ४३ धावांची खेळी खेळली, पण संघाला लक्ष्य गाठता आले नाही. तत्पूर्वी, भारत ब संघ ६ विकेट्सवर १५० धावांवर खेळताना केवळ ३४ धावा जोडू शकला.