अवघ्या जगाचा मास्टर ब्लास्टर अर्थात आपला सचिन आज ५० वर्षांचा झाला. त्याच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त फक्त मुंबईच नाही, महाराष्ट्रच नाही, भारतच नाही तर जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांकडून त्याला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जात आहेत. प्रत्येकजण आपल्या परीने आपल्या लाडक्या ‘तेंडल्या’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. विशेष म्हणजे त्या शुभेच्छा आपण दिल्यानंतर सचिनपर्यंत पोहोचल्याचंही समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. सचिनच्या ५०व्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एक विलक्षण भेट सचिनला दिली आहे. या भेटीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. आणि अर्थात, सचिनच्या चाहत्यांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे!

सचिन आणि ब्रायन लाराच्या नावाचं गेट!

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ऑस्ट्रेलियातल्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा यांची नावं एका गेटला दिली आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर जाणाऱ्या सर्व विदेशी खेळाडूंना या गेटमधूनच मैदानात प्रवेश करता येणार आहे. सदस्यांसाठीचं पॅव्हेलियन, ड्रेसिंग रूम आणि नोबल ब्रॅडमन मेसेंजर स्टॅंडला लागून हे गेट आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू या मैदानावर डॉन ब्रॅडमन गेटमधून प्रवेश करतात.

Sachin Tendulkar 50th Birthday : आपला सचिन आहे अस्सल खवय्या! ‘हे’ दोन पदार्थ आहेत वीक पॉईंट

सचिनचा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा आणि सिडनी ग्राऊंड

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार या भेटीवर सचिन तेंडुलकरनं प्रतिक्रिया दिली आहे. “सिडनी क्रिकेट ग्राऊंड हे भारताबाहेरचं माझं सर्वात आवडतं मैदान राहिलं आहे. १९९१-९१ साली मी ऑस्ट्रेलियाचा पहिला दौरा केला होता. त्या दौऱ्यापासून या मैदानाशी निगडित माझ्या अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत”, असं सचिन म्हणाला. “सिडनी मैदानावर सर्व विदेशी खेळाडूंना जाण्यासाठीच्या गेटवर माझं आणि माझा प्रिय मित्र ब्रायन लाराचं नाव देण्यात आल्यामुळे हा मी माझा सन्मान मानतो. सिडनी क्रिकेट ग्राऊंड प्रशासन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मी आफभार मानतो. मी लवकरच सिडनी क्रिकेट ग्राऊंडला भेट देईन”, असंही सचिनने आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच वृत्तामध्ये ब्रायन लारा यांचीही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “सिडनी क्रिकेट ग्राऊंडकडून मिळालेल्या या सन्मानासाठी मी आभारी आहे. सचिनही असेलच याची मला खात्री आहे. या मैदानाशी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या अनेक आठवणी जोडलया गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियात असताना या मैदानाला भेट देणं ही माझ्यासाठी कायमच आनंदाची बाब ठरली आहे”, असं लारा म्हणाले.