सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत विदर्भाचा फिरकी गोलंदाज अक्षय कर्णेवारने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. अक्षय सध्या शानदार गोलंदाजी करत आहे. मणिपूरनंतर अक्षयने सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ५ धावा देत ४ बळी घेतले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दोन्ही हातांनी गोलंदाजी करणाऱ्या अक्षय आपल्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. 

सोमवारी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात अक्षय कर्नावरने मणिपूरविरुद्ध चार षटकांच्या कोट्यात एकही धाव दिली नाही. चार षटके मेडन टाकण्याचा विक्रम अक्षय कर्नावरच्या नावावर आहे. यासह टी -२० फॉरमॅटमध्ये ही कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.

सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २०५ धावा केल्या. जितेश शर्माने नाबाद ५४ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार अक्षय वाडकरने ४० धावांची खेळी केली. सिक्कीमकडून सुमित सिंग आणि पालजोर तमांग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा गोलंदाज अक्षय कर्नावरच्या खेळासमोर सिक्कीमचा संघ ८ विकेटच्या मोबदल्यात ७५ धावाच करू शकला. अशा प्रकारे सिक्कीमला १३० धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

मणिपूरविरुद्ध खेळताना रचला इतिहास 

अक्षय कर्नावारने ४ षटके मेडन टाकत २ बळी घेतले. हा विक्रम टी -२० आंतरराष्ट्रीय आणि फ्रेंचाइजी टी -२० क्रिकेटमध्येही बनलेला नाही. अक्षय कर्णवार म्हणाला, “मी स्वत: या विक्रमाने आश्चर्यचकित आहे. हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. संपूर्ण सामन्यात एकही धाव न देणे ही साधी बाब नाही.”

दोन्ही हातांनी करू शकतो गोलंदाजी

अक्षय कर्नावारची खासियत आहे की तो दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो. याशिवाय तो फलंदाजीसाठी देखील नेहमीच तयार असतो. अक्षय कर्णवारने वयाच्या १३ व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. अक्षय कर्नावारने प्रशिक्षक बाळू नवघरे यांच्या हाताखाली प्रशिक्षण सुरू केले. त्याच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान, नवघरेंनी त्याला उजव्या हाताचा ऑफ-स्पिनर म्हणून पाहिले, परंतु नंतर त्याला डाव्या हाताची फिरकी गांभीर्याने घेण्यास प्रोत्साहित केले.