इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन हा अनेकदा भारतीय क्रिकेट संघाबद्दल कठोर वक्तव्य करण्यासाठी ओळखला जातो. पण टी -२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन सराव सामन्यांमध्ये टीम इंडियाने ज्याप्रकारे कामगिरी केली त्याबद्दल मायकल वॉन खूश झाला आहे. १८ ऑक्टोबरला खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केल्यानंतर विराट कोहलीच्या सैन्याने २० ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियालाही पराभूत केले.

भारताकडून केएल राहुल, रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी जोरदार फलंदाजी केली. याशिवाय आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने गोलंदाजीमध्ये चमत्कार केला. सराव सामन्यात भारताने ज्या प्रकारे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी पराभव केला. त्यामुळे विराटसेनेचे खूप कौतुक केले जात आहे. दरम्यान, मायकल वॉनने भारतीय संघाला विश्वचषकात विजेतेपदासाठी दावेदार मानले आहे.

 भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयानंतर मायकेल वॉनने एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘भारतीय संघ ज्या प्रकारे सराव सामना खेळत आहे ते पाहता, भारतीय संघ आता टी -२० विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार दिसत आहे.  ऑस्ट्रेलिया  संघाविरुद्ध खेळलेल्या सराव सामन्यात रोहित शर्माने उत्कृष्ट फलंदाजी करताना ४१ चेंडूत ६० धावा केल्या. तर केएल राहुलने ३१ चेंडूत ३९ धावांची आकर्षक खेळी खेळली. याशिवाय सूर्यकुमार यादवनेही २७ चेंडूत ३८ धावा केल्या, त्याचा फॉर्म सूचित करतो. याशिवाय अश्विनने गोलंदाजीत चांगली कामगिरी करत दोन षटकांत ८ धावा देऊन २ बळी घेतले.