टी २० वर्ल्डकपमध्ये आता उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र वर्ल्डकप स्पर्धा पुढे जात असताना रविवारी एक दु:खद बातमी समोर आली आहे. अबूधाबी स्टेडियमचे पिच क्यूरेटर मोहन सिंह यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहे. त्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे.

मोहन सिंह यांनी पंजाबमधील मोहाली स्टेडियमध्ये बराच काळ काम केल्यानंतर अबूधाबीत काम करणं सुरु केलं होतं. यापूर्वी मोहालीच्या मैदानाचे सुपरवायजर आणि असिस्टेंट कोच म्हणून काम केलं होतं. यूएईत जाण्यापूर्वी त्यांनी बीसीसीआयकडून पिच क्यूरेटरचं प्रशिक्षण घेतलं होतं. मोहन सिंह यांच्यासाठी हे वर्ष खूपच व्यस्त होतं. त्यांनी पीएसएल, आयपीएल आणि वर्ल्डकपमध्ये सलग काम केलं होतं.

२००७ वर्ल्डकपमध्ये झाली होती अशीच घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१७ मार्च २००७ पाकिस्तान आणि आयर्लंड दरम्यान वर्ल्डकप सामना खेळला गेला होता. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यानंतर वर्ल्डकपमधून संघ बाहेर गेला होता. या स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर होता. मात्र पुढच्या दिवशीच संघाचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांची मृतदेह आढळून आला होता. जमैकाच्या एका हॉटेलमधील बाथरूमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या शरीरावर कोणतेच कपडे नव्हते. या घटनेनंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सवर संशय व्यक्त केला गेला होता.