टीम इंडियाने सध्या सुरू असेलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय मिळवला. ८ गडी आणि ८१ चेंडू राखून भारताने स्कॉटलंडचा पराभव केला. स्कॉटलंडने भारताला अवघ्या ८६ धावांचे आव्हान दिले होते. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी आक्रमक फंलदाजीचा नजराणा पेश करत स्कॉटलंडच्या गोलंदाजांची पिसे काढली. राहुलने १८ चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकले. यावेळी त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी स्टँड्समध्ये उपस्थित होती. राहुलची बॅटिंग पाहून अथिया खूप खूश झाली.

दुबईच्या मैदानावर राहुलने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. यावेळी अथिया स्टँड्समधून त्याला चिअर करत होती. अथियासोबत रोहितची पत्नी रितिकाही होती. अथियाचे सामन्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. राहुलने अर्धशतक ठोकत अथियाला बर्थडे गिफ्ट दिल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले. अथिया ही बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे.

भारतीय संघाचा कप्तान विराट कोहलीचा आज ३३वा वाढदिवस आहे. सोबतच अथियाचाही आज वाढदिवस आहे. त्यामुळे राहुलने अथियाला आपल्या फलंदाजीद्वारे खास बर्थडे गिफ्ट दिले. राहुलने १८ चेंडूत ५० धावा केल्या आणि १९ व्या चेंडूवर बाद झाला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

हेही वाचा – Video: “मी जाडी झाली तरी माझ्यावर प्रेम करशील”; सानिया मिर्झाने शोएब मलिकला प्रश्न विचारताच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका ब्रॅण्डच्या जाहिरातीदरम्यान अथिया आणि राहुलची मैत्री झाली. भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर असताना राहुल आणि अथियाच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या टूरवर दोघसोबत गेल्याचे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून लक्षात आले. अद्याप दोघांनी त्याच्या रिलेशनशिपबद्दर जाहीरपणे कबुली दिलेली नाही.