टी २० वर्ल्डकप दरम्यान पाकिस्तानचा संघ सध्या चांगलाच फॉर्मात आहे. भारताला १० विकेट राखून पराभूत केल्याने पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढला आहे. पाकिस्तानने भारताला वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच पराभूत केलं आहे. पाकिस्तानचा संघ आतापर्यंत सलग तीन सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तसेच उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केलं आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ खेळत असून भारत पाकिस्तान सामन्यावेळची एक बातमी बाबरच्या वडिलांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. आझम सिद्दीकी यांनी बाबरच्या आईबाबतचा खुलासा केला आहे.

“जेव्हा बाबरची आई शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवर होती. मी तेव्हा रुग्णालयात होतो. पण सामना पाहण्यासाठी दुबईला गेलो. बाबरची चिंतामुक्त राहावा यासाठी मी निर्णय घेतला. आता बाबरच्या आईची तब्येत ठीक आहे.”, अशी पोस्ट बाबरच्या वडिलांनी केली आहे.

पाकिस्तानने भारताला पराभूत करताच स्टँडमध्ये उपस्थित बाबरच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते. बाबरच्या वडिलांचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाबर आझमचा हा पहिला टी २० वर्ल्डकप आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करत आहे. तसेच बाबर आझम फलंदाजीने क्रिकेटमधील नवनव्या विक्रमांना गवसणी घालत आहे. बाबर आझमने भारतीय कर्णधार विराट कोहलीचा आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबरने २७ सामन्यात हजार धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ३० सामन्यात हजार धावा केल्या होत्या.