टी २० वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ अंतिम फेरी गाठेल, असं अनेक दिग्गज खेळाडूंनी अंदाज बांधला होता. मात्र सुपर १२ फेरीतील सलग दोन पराभवामुळे भारताचं उपांत्य फेरीचं गणित बिघडलं आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं भारताला १० गडी राखून पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. यामुळे भारताच्या उपांत्य फेरीचा प्रवास खडतर झाला आहे. तरी भारताला उपांत्य फेरी गाठता येण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित तीन सामन्यांसोबत भारताचं उपांत्य फेरीचं गणित न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसं असेल उपांत्य फेरीचं गणित

  • भारताने अफगाणिस्तानला ८० हून अधिक धावा, स्कॉटलँडला १०० हून अधिक धावा, नामिबियाला १०० हून अधिक धावांनी पराभूत केलं पाहीजे
  • अफगाणिस्तानने न्यूझीलंडला कमी अंतराने पराभूत केलं पाहीजे
  • न्यूझीलंडने स्कॉटलँड आणि नामिबियाला जवळपास ५० धावांपेक्षा कमी धावांनी पराभूत केलं पाहीजे.

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. न्यूझीलंडने भारताला २० षटकात ७ बाद ११० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात सलामीवी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी रच न्यूझीलंडच्या विजयावर सहज शिक्कामोर्तब केले. सोधीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला पराभूत करण्याची परंपरा कायम राखली.

सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला, ”हे निर्दयी होते. फलंदाजी आण गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यावर आम्ही धाडसी नव्हतो. आम्ही मैदानात उतरलो तेव्हा आमची देहबोली कमकुवत होती, तर न्यूझीलंड संघाची तीव्रता आणि देहबोली चांगली होती. जेव्हा आम्ही पहिल्या डावात धावा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही संधी साधल्या आणि विकेट गमावल्या. यामुळे आम्ही शॉटसाठी जावे की नाही याबद्दल संकोच करत होतो. भारताकडून खेळताना खूप अपेक्षा असतात. लोक आमच्यासाठी स्टेडियममध्ये येतात आणि भारतासाठी खेळणाऱ्या प्रत्येकाने ते स्वीकारले पाहिजे आणि त्याचा सामना केला पाहिजे. आम्ही या दोन सामन्यांमध्ये तसे केले नाही आणि म्हणूनच आम्ही जिंकलो नाही. आपण आशावादी आणि सकारात्मक असायला हवे आणि मोजून जोखीम पत्करली पाहिजे. आम्हाला दबावापासून दूर राहावे लागेल आणि आमची प्रक्रिया सुरू ठेवावी लागेल आणि सकारात्मक क्रिकेट खेळावे लागेल. या स्पर्धेत खेळण्यासाठी भरपूर क्रिकेट आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc india chances for semi final equations rmt
First published on: 31-10-2021 at 23:33 IST