T20 WC: काय सांगता..! विराटच्या शेवटच्या सामन्यात रोहित असणार संघाबाहेर? जाणून घ्या कारण

आज भारत नामिबियाविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळणार आहे. टी-२० कप्तान म्हणून विराटचा हा शेवटचा सामना आहे.

t20 wc india vs namibia team india playing 11 rohit sharma could be rested
टीम इंडिया

टी-२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेली टीम इंडिया त्यांचा शेवटचा लीग सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. आज भारत नामिबियाशी सामना करणार आहे. नामिबियाच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याने नक्कीच सर्वांची मने जिंकली आहेत. या सामन्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीच्या टी-२० कर्णधारपदाचा हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे तो शेवट गोड करण्यास नक्कीच उत्सुक असेल.

अखेरच्या साखळी सामन्यात टीम इंडिया कोणत्या खेळाडूंसोबत मैदानात उतरणार, हे पाहणे गरजेचे आहे. भारतीय संघ आधीच स्पर्धेबाहेर झाला आहे आणि अशा स्थितीत संघ व्यवस्थापन इतर खेळाडूंना आजमावू शकते. माध्यमांच्या वृत्तानुसार, टीम इंडियामध्ये ३-४ बदल शक्य आहेत. रोहित शर्माचाही यात समावेश आहे.

हेही वाचा – विराटला टीम इंडियातून मिळणार होता डच्चू! सेहवागचा मोठा खुलासा; म्हणाला, “धोनी आणि…”

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिला बदल सलामीवीर खेळाडूंमध्ये होऊ शकतो. म्हणजे रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याच्या जागी इशान किशनला पुन्हा संधी मिळू शकते. गोलंदाजीत तीन बदल होऊ शकतात. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांना विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्यांच्या जागी शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि राहुल चहर यांना संघात घेतले जाऊ शकते.

भारत आणि नामिबिया यांच्यात तब्बल १८ वर्षांनंतर सामना होणार आहे. या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. २००३ च्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि नामिबिया यांच्यात सामना झाला होता. नामिबियाचा संघ भारताला आव्हान देऊ शकतो कारण त्यांच्याकडे डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत. नामिबिया विरुद्धचा हा सामना टीम इंडियाचा १५० वा टी-२० सामना असेल. या कालावधीत संघाने ९४ विजय मिळवले असून ५१ पराभव पत्करले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc india vs namibia team india playing 11 rohit sharma could be rested adn

Next Story
इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ सामना
ताज्या बातम्या