टी २० वर्ल्डकपच्या न्यूझीलंडला स्कॉटलंडने कडवी झुंज दिली. न्यूझीलंडने दिलेल्या १७३ धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ ५ गडी गमवून १५६ धावा करू शकला. शेवटच्या षटकापर्यंत स्कॉटलंडच्या फलंदाजांनी सामना जिंकण्याासाठी प्रयत्न केला. स्कॉटलंडला नमवल्याने न्यूझीलंडने उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊन आणखी पुढे टाकलं आहे. तर स्कॉटलंडने सलग चार सामने गमवल्याने स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्कॉटलंडचा डाव
न्यूझीलंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडने चांगली सुरुवात केली. जॉर्ज मुनसे आणि काएल कोएत्झर यांनी दबाव झुगारून खेळी केली. पण संघाची धावसंख्या २१ असताना काएल कोएत्झर बाद झाला. त्याने ११ चेंडूत १७ धावा केल्या. या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर जॉर्ज मुनसेच्या रुपाने दुसरा धक्का बसला. त्याने १८ चेंडूत २२ धावा केल्या. या खेळीत १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. मॅथ्यू क्रॉस २९ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. मॅथ्यूने एडम मिलनेच्या एका षटकात ५ चौकार मारले. त्यानंतर मॅकल्योड १२ धावा करून तंबूत परतला. तर सोढीच्या गोलंदाजीवर रिची बेरिंगटोन २० धावा करून माघारी परतला. मिशेल लीक्सने २० चेंडूत ४२ धावांची नाबाद खेळी केली.

न्यूझीलंडचा डाव
न्यूझीलंडला संघाची धावसंख्या ३५ असताना पहिला धक्का बसला. डॅरिल मिशेल १३ धावा करून तंबूत परतला. शफयान शरिफच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या केन विलियमसनला आपलं खातंही खोलता आलं नाही. शफयानच्या गोलंदाजीवर मॅथ्यू क्रॉसने त्याचा झेल घेतला. डेवॉन कॉनवेही अवघी १ धाव करून माघारी परतला. मार्क वॅटने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. चौथ्या गड्यासाठी मार्टिन गुप्टिल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यात शतकी भागीदारी झाली. ब्रॅड व्हिलच्या गोलंदाजीवर फिलिप्सने उंच फटका मारल्यानंतर ख्रिस ग्रीव्ह्सने त्याचा झेल घेतला. फिलिप्सने ३७ चेंडूत ३३ धावा केल्या. पुढच्या चेंडूवर मार्टिन गुप्टील ९३ धावा करून बाद झाला. त्याचं शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं. ५६ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ९३ धावा केल्या. ब्रॅड व्हिलच्या गोलंदाजीवर कॅलम मॅकल्योडने त्याचा झेल घेतला.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, डेव्हन कॉन्वे (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, मिचेल सेंटनर, ईश सोधी, टिम साउदी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट.

स्कॉटलंडचा संघ- काएल कोएत्झर, जॉर्ज मुन्से, मॅथ्यू क्रॉस, रिची बेरिंगटन, कलम मॅकल्योड, मिशेल लीक्स, ख्रिस ग्रीव्ह्स, मार्क वॅट, सफयान शरिफ, अलसडेर इवान्स, ब्रॅड व्हिल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc nz vs scot match update rmt
First published on: 03-11-2021 at 15:05 IST