टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ चांगलाच फॉर्मात आहे. बाबर आझमची खेळी कर्णधारपदाला साजेशी आहे. वर्ल्डकपमध्ये त्याने चौथी अर्धशतकी खेळी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बाबर ९ धावा करून बाद झाला होता. मात्र भारत, अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. भारताविरुद्धच्या सामन्यात ५२ चेंडूत नाबाद ६८ धावा, अफगाणिस्तान विरूद्ध ४७ चेंडूत ५१ धावा, नामिबिया विरुद्ध ४९ चेंडूत ७० धावा आणि आता स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात ४७ चेंडूत ६६ धावा केल्या. या अर्धशतकी खेळीनंतर बाबरने पाकिस्तानी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मॅथ्यू हेडनने २००७ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये ४ अर्धशतकं झळकावली होती. आता २०२१ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये बाबरने ४ अर्धशतकं झळकावत या विक्रमाची बरोबरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅथ्यू हेडन २००७ टी २० वर्ल्डकपमद्ये एकूण ६ सामने खेळला होता. यात ४ अर्धशतकं झळकावत २६५ धावा केल्या होत्या. तर नाबाद ७३ ही सर्वोत्तम खेळी होती. तर बाबर आझमने २०२१ च्या वर्ल्डकपमध्ये ५ सामने खेळत ४ अर्धशतकं झळकावली आहे. तर नामिबिया विरुद्धची खेळलेली ७० धावांची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने आतापर्यंत एकूण २६४ धावा केल्या आहेत.

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील स्कॉटलंडविरुध्दच्या सामन्यात पाकिस्ताननं विजयासाठी १९० धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्ताननं २० षटकात ४ गडी गमवून १८९ धावा केल्या. उपांत्य फेरीत पाकिस्तानने यापूर्वीच धडक मारल्याने स्कॉटलंडविरुद्धचा सामना निव्वळ औपचारिकता आहे. सलामीला आलेल्या मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र मोहम्मद रिझवान हमजा ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १९ चेंडूत १५ धावा केल्या. या खेळीत एका षटकाराचा समावेश आहे. फखर झमानच्या रुपाने पाकिस्तानला दुसरा धक्का बसला. ख्रिस ग्रीव्ह्सच्या गोलंदाजीवर मायकल लीक्सने त्याचा झेल घेतला. मोहम्मद हफीज १९ चेंडूत ३१ धावांची खेळी करून बाद झाला. त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारत आक्रमक फलंदाजी केली. मात्र सफयान शरिफच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कर्णधारपदाला साजेशी खेळी करून बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ६६ धावा केल्या. या खेळीत ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc pakistan babar azam equals coach matthew hayden record rmt
First published on: 07-11-2021 at 21:15 IST