scorecardresearch

Premium

T20 WC ENG vs SL : श्रीलंकेची झुंज अपयशी; इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक!

शारजाहच्या मैदानावर इंग्लंडनं श्रीलंकेला २६ धावांनी मात दिला.

t20 world cup 2021 england vs sri lanka match report
इंग्लंडची श्रीलंकेवर मात

टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडने स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा २६ धावांनी पराभव केला. प्रथम खेळताना इंग्लंडने ४ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या. जोस बटलरने नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्याचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक ठरले. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १० गड्यांच्या मोबदल्यात १३७ धावाच करू शकला. बटलरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यापूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचाही पराभव केला होता. तीन पराभवांसह श्रीलंका संघ अंतिम-चारच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. २०१४ मध्ये श्रीलंकेने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर इंग्लंड संघाने २०१० मध्ये विजेतेपद पटकावले आहे.

श्रीलंकेचा डाव

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

इंग्लंडच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी २४ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. चरित असलांकाने २४ धावा केल्या. भानुका राजपक्षे २६ आणि अविष्का फर्नांडो १३ धावा करून बाद झाले. अशाप्रकारे संघाने ७६ धावांत ५ विकेट गमावल्या. अखेरच्या ५ षटकात संघाला ५१ धावा करायच्या होत्या. लेगस्पिनर आदिल रशीदने दोन बळी घेत संघाला मोठे यश मिळवून दिले.

हेही वाचा – IPL 2022 : मोठी बातमी! धोनीला नाहीये CSKतून खेळण्याची इच्छा; फ्रेंचायझीला म्हणाला, ‘‘माझ्यावर…”

इंग्लंडचा डाव

मागील सामन्याप्रमाणे जोस बटलरने आपला फॉर्म कायम राखत इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. त्याचा साथीदार जेसन रॉय लवकर तंबूत परतला. डेव्हिड मलान आणि जॉनी बेअरस्टोही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर कप्तान ईऑन मॉर्गनसोबत बटलरने किल्ला लढवला. या दोघांनी आक्रमक शतकी भागीदारी उभारली. १९व्या षटकात मॉर्गन (४०) माघारी परतला. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बटलरने शतक साजरे केले. बटलरने ६७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक ठरले.२० षटकात इंग्लंडने ४ बाद १६३ धावा उभारल्या.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

इंग्लंड – जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, ईऑन मॉर्गन (कप्तान), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि टाइमल मिल्स.

श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल परेरा (यष्टीरक्षक), चरित असालंका, भानुका राजपक्षे, अविष्का फर्नांडो, वानिंदु हसरंगा, दासुन शनाका (कप्तान), चमिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, महेश थिक्षणा आणि लाहिरु कुमारा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-11-2021 at 19:27 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×