ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स असा झाला. या विजयासह उपांत्य फेरीत पोहोचण्याचे दक्षिण आफ्रिकेचे लक्ष होते. मात्र, नेदरलँड्सने अविश्वसनीय खेळ दाखवत विजेतेपदाचे दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिकेला १३ धावांनी पराभूत करत अपसेट घडवला. या पराभवास दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून, भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यासोबतच बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान हा पुढील सामना उपांत्यपूर्व फेरी सारखा खेळला जाईल. या सामन्यात विजेता होणारा संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवामुळे पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटर यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वसीम अक्रम, इमाद वसीम, वहाब रियाज आणि इत्तर खेळाडूंनी यावर ट्विटर ट्विट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेदरलँडच्या या विजयाने बांग्लादेश आणि पाकिस्तानलाही मोठा दिलासा मिळाला असून या दोन्ही संघांच्या सेमीफायनलच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.