West Indies Beat Papua New Guinea by 5 wickets: टी-२० वर्ल्डकपमधील पहिल्या सामन्यात, यजमान वेस्ट इंडीजने पापुआ न्यू गिनीचा ५ गडी राखून पराभव केला. पण बलाढ्य वेस्ट इंडिज संघासाठी हा विजय अजिबातच सोपा नव्हता. वेस्ट इंडिजच्या यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकातील हा पहिला सामना होता आणि तो प्रोविडेन्स क्रिकेट स्टेडियम, गयाना येथे खेळवला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने पीएनजीविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पीएनजीला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १३६ धावा करता आल्या. गयानाच्या संथ खेळपट्टीवर ही धावसंख्या गाठताना यजमान वेस्ट इंडिजची अवस्था बिकट झाली.

हेही वाचा – T20 WC 2024: वर्ल्डकपमध्ये सुपर ओव्हरचा थरार; डेव्हिड व्हिसा ठरला नामिबियाच्या विजयाचा शिल्पकार

लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १०० धावांच्या आत पाच विकेट गमावल्या होत्या, परंतु सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या आंद्रे रसेलने येताच फटकेबाजी केली, ज्यामुळे संघाला पुनरागमन करता आले. रसेलने ९ चेंडूत १५ धावांची खेळी खेळली. याशिवाय रोस्टन चेसने संघासाठी ४२ नाबाद धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. रोस्टन चेसने २७ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि १ षटकार लगावले. याशिवाय ब्रेंडन किंगने २९ चेंडूत ३४ धावा केल्या. तर निकोलस पूरनने २७ आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलने १५ धावांचे योगदान दिले. संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रोस्टन चेसची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला वेस्ट इंडिजचा संघ पीएनजीच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध झुंजताना दिसला, तर कर्णधार असद्दोलावालाने चार षटकांत २८ धावा देऊन सर्वाधिक २ विकेट घेतले. तर एली नाओ, चॅड सोपर आणि जॉन कारिको यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. केवळ १३६ धावांचा लक्ष्याचा बचाव करणाऱ्या पीएनजी संघाने गोलंदाजीत वेस्ट इंडिजसारख्या संघाविरुद्ध ज्या प्रकारे झुंज दिसी ते कौतुकास्पद होते.

हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, पंड्याच्या बायकोने इन्स्टाग्रामवर पुन्हा केला बदल, ‘ते’ फोटो…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुफान फॉर्ममध्ये असलेल्या आंद्रे रसेलने पीएनजीविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. रसेलने तीन षटकांत केवळ १९ धावा देत २ विकेट घेतले. याशिवाय अल्झारी जोसेफनेही दोन गडी बाद केले. अकिल होसेन, रोमारियो शेफर्ड आणि मोती यांनीही प्रत्येकी एक विकेट मिळाली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीविरुद्ध पीएनजीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज सिस बाओने ५० धावांची खेळी खेळली. हे त्याचे टी-२० विश्वचषकातील पहिले अर्धशतक होते. याशिवाय किपलिन डोरिगाने २७ धावा तर कर्णधार असद्दोलावालाने २१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.