T20 WC: ‘‘पाकिस्तान का खेळतोय?, तुम्ही आम्हाला…”; हरभजननं शोएब अख्तरची काढली कळ!

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान २४ ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत.

t20 world cup harbhajan singh teased shoaib akhtar before india vs pakistan match
भज्जीचा अख्तरला इशारा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषकाच्या लढतीपूर्वी, अनुभवी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरला आधीच इशारा दिला आहे. भारत आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सामना जिंकणार आहे, असे हरभजनने म्हटले.

स्टार स्पोर्ट्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हरभजन म्हणाला, “मी शोएब अख्तरला सांगितले, पाकिस्तान का खेळतोय? तुम्ही आम्हाला वॉकओव्हर द्या, तुम्ही खेळाल, तुम्ही पुन्हा पराभूत व्हाल, तुम्ही अस्वस्थ व्हाल. आमची टीम खूप मजबूत आहे आणि आम्ही तुम्हाला सहज पराभूत करू.”

हेही वाचा – T20 World Cup : भारताविरुद्धच्या सामन्याला ९ दिवस उरले असताना पाकिस्तानला बसला ‘मोठा’ धक्का!

एकदिवसीय किंवा टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला एकदाही पराभूत केले नाही. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा विक्रम ७-० आणि टी-२० मध्ये ५-० असा आहे. आगामी वर्ल्डकपमध्ये २४ ऑक्टोबरला दोन्ही संघ आमनेसामने असतील.

२००७ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासह दोन्ही संघांमध्ये अनेक संस्मरणीय टी-२० सामने खेळले गेले. २००७मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्डकप सुरू होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup harbhajan singh teased shoaib akhtar before india vs pakistan match adn

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या